लासलगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   जयदत्त होळकर मित्र मंडळ लासलगांव, नाज ए वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्था लासलगांव, मदिना सोशल ग्रुप रजा नगर, पिंपळगांव (नजिक) यांच्या संयुक्त विद्यमाने लासलगांव शहरात मालेगांव येथील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य निदान शिबिर तसेच कोविड १९ ची चाचणी दि १९,२०,२१ एप्रिल २०२१ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेच्या कालावधीत लासलगाव ग्रामपंचायत येथे मोफत केली जाणार असून या शिबिरात रुग्णांना औषधे मोफत दिली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे .

लासलगाव व परिसरातील सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी तसेच सदर शिबिरात येतांना नागरिकांनी मास्क लावुनच येणे तसेच शासनाने जे नियम लावुन दिले आहे , ते सर्व पाळणे बंधनकारक आहे.लासलगाव व परिसरातील नागरिकांनी या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन लासलगाव ग्रामपंचायत चे सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच अफजल शेख,पिंपळगाव नजीक ग्रामपंचायत सदस्य लतीफ तांबोळी यांनी केले आहे.