ऑस्करमध्ये ‘या’ सिनेमांना मिळाली ‘एन्ट्री’, स्पर्धेतून बाहेर झाली रणवीर-आलियाची ‘गली बॉय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा गली बॉय हा सिनेमा 92 व्या अकदामी पुरस्कारासाठी निवडला गेला होता. भारताकडून हा सिनेमा बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्मच्या कॅटेगरीतून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. हे एकून चाहते खुश झाले होते. परंतु आता मात्र हा सिनेमा फिचर फिल्मच्या यादीतून बाहेर पडला आहे.

फिचर फिल्मसाठी या नावांचा यादीत समावेश

द पेंटेंड वर्ड(Czech Republic), ट्रुथ अँड जस्टीस(Estonia), Les Misérables (France), Those Who Remained (Hungary), हनीलँड (North Macedonia), Corpus Christi (Poland), Beanpole (Russia), Atlantics (Senegal), (Parasite South Korea) आणि पैन अँड ग्लोरी(Spain) इत्यादी.

गली बॉयला मिळाले ‘हे’ अवॉर्ड

गली बॉय सिनेमाला मोठी पसंती मिळताना दिसली. या सिनेमाला आधी बेस्ट एशियन फिल्मच्या कॅटेगरीत NETPAC अवॉर्ड मिळाला होता. साऊथ कोरियात हा कार्यक्रम पार पडला होता. यावर्षी ऑगस्टमध्ये मेलबर्न मध्ये झालेल्या इंडियन फेस्टीवल मध्ये गली बॉयला बेस्ट फिल्मचा किताब मिळाला होता.

गेल्या वर्षी व्हिलेज रॉकस्टार या सिनेमाला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलं होतं. परंतु हा सिनेमा नंतर रेसमधून बाहेर पडला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/