‘इथियोपिया’मध्ये रहस्यमय आजारांन प्रचंड खळबळ, मृत्यूपुर्वी लोकांच्या नाक आणि तोंडातून निघतंय रक्त, चीनकडे ‘बोट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफ्रिकी देश असलेल्या इथिओपियामध्ये एका भयानक रहस्यमय आजार पसरण्यास सुरुवात झाली आहे. या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव होतो आणि त्यानंतर त्यांचा जीव जातो. स्थानिक लोकांनी या आजाराचे कारण चिनी तेल ड्रिलिंगमधून निघणारे विषारी पदार्थ सांगितले आहे. हा आजार सोमालीच्या एका गॅस प्रकल्पाच्या जवळील गावात पसरला आहे. तेथील लोकांनी सांगितले की बाधित झालेल्यांचे डोळे पहिल्यांदा पिवळे होण्यास सुरुवात झाली आणि ताप येण्यापूर्वी त्यांच्या अंगावर सूज आली आणि अखेरीस त्यांचा मृत्यू झाला.

या आजाराची लक्षण म्हणजे हाताचे तळवे पिवळे होणे, भूख न लागणे आणि झोप न येणे ही आहेत. एका वृत्तपत्रांच्या वृत्तानुसार इथिओपियाच्या राजधानी अदीस अबाबामध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी या भागातील पर्यावरण संकट आणि आरोग्याचा त्रास हे सर्व आरोप फेटाळले.

हा कोणत्या प्रकारचा आजार आहे, याचे कारण काय आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही परंतु या आजाराने लोकांचा जीव जात आहे. तर काही लोकांना शंका आहे की हे सर्व रासायनिक कचऱ्यामुळे होत आहे, ज्याने परिसरातील पाणी विषारी झाले आहे.

एक पीडित खादर आब्दी अब्दुल्लाही यांनी सांगितले होते की, महामारीला जबाबदार कॅलुब गॅस क्षेत्रात पसरणारे विषारी पदार्थ आहे. जिगजिगा येथे राहणारे रहिवासी अब्दुल्लाई ज्यांचे वय 23 होते, यांनी रुग्णालयातून हे कारण सांगून घर पाठवण्यात आले होते की, त्यांच्याकडे या आजाराचा कोणताही इलाज नाही, ते काही करु शकत नाहीत. ज्यानंतर त्यांचा या जीवघेण्या आजाराने मृत्यू झाला.

सोमालीतील स्थानिक सरकारच्या एका सल्लागाराने दावा केला की हा एक नव्या प्रकारचा आजार आहे, यापूर्वी हा आजार कधी आढळला नाही. त्यांनी स्पष्ट केले की हे सत्य आहे की POLY-GCL ज्या रसायनांचा वापर करते जे मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. चीनच्या POLY-GCL पेट्रोलियम इनवेस्टमेंट्सने मागील वर्षी रेड सी राज्यात एका निर्यात टर्मिनलसाठी इथिओपियाच्या गॅसच्या परिवहनासाठी आवश्यक असलेल्या एका प्राकृतिक गॅस पाइपलाइनासाठी 767 किलोमीटराचा रस्ता तयार करण्याच्या योजनेची माहिती दिली होती.