Bacterial Fungus : कोरोनाच्या उपचारानंतर बॅक्टेरियल फंगसने मृत्यूचा धोका जास्त, ICMR रिसर्च

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस लोकांसाठी सर्वात मोठी समस्या आहे. या संसर्गाचा उपचार करणे रूग्णांना महागात पडत आहे. कोरोनाच्या उपचारात रूग्णांना दिल्या जाणार्‍या औषधांमध्ये स्ट्राइडच्या अतिसेवनाने रूग्णांना इतर अनेक बॅक्टेरियल संसर्ग (Bacterial Fungus)  होत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या एका रिसर्चनुसार कोरोनाच्या दरम्यान किंवा उपचारानंतर ज्या रूग्णांमध्ये बॅक्टेरियल किंवा (Bacterial Fungus)  फंगल इन्फेक्शन झाले त्यांच्यापैकी निम्म्या लोकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

बॅक्टेरिया काय आहे?
बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, पॅरासाईट इत्यादी सूक्ष्म जीवांना म्हणतात, ज्यांच्यामुळे न्यूमोनिया, यूटीआय, स्किन डिसीज इत्यादी आजार होतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या रिसर्चमध्ये 10 हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मरणार्‍या रूग्णांवर चाचणी करण्यात आली ज्यामध्ये मुंबईच्या सायन आणि हिंदुजा हॉस्टिलचा सुद्धा समावेश आहे.

अभ्यास अतिशय आश्चर्यचकीत करणारा होता. अभ्यासानुसार, कोरोनाने संक्रमित त्या व्यक्ती ज्या सेकंडरी बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शनने पीडित होत्या, त्यांच्यापैकी निम्म्या लोकांचा मृत्यू झाला. सेकेंडरी बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शनचा अर्थ कोरोनाच्या दरम्यान किंवा नंतर व्यक्तीमध्ये बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होणे.

इतर इन्फेक्शनमुळे 56 टक्के रूग्णांचा मृत्यू :
रिसर्चमध्ये 10 हॉस्पिटलवर अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये आढळले की, कोरोना रूग्ण ज्यांना इतर संसर्ग झाले, हॉस्पिटल्सवर अभ्यास करण्यात आला ज्यामध्ये आढळले की, कोरोना रूग्ण ज्यांना इतर संसर्ग झाला, त्यांच्यापैकी 56.7 टक्केंचा मृत्यू झाला. मात्र, कोणत्याही ठोस निष्कर्षावर पोहचण्यासाठी हा अभ्यास पुरेसा नाही.

अभ्यासात 10 हॉस्पिटलमध्ये 17,536 कोरोना रूग्णांना सहभागी करण्यात आले, ज्यामध्ये 3.6 टक्के म्हणजे 631 रूग्णांना सेकेंडरी बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन झाले होते. या 631 रूग्णांपैकी 56.7 टक्के रूग्णांचा मृत्यू झाला.

अँटिबायोटिक्स वापरणे नाईलाज
आयसीएमआरच्या सिनियर सायंटिस्ट कामिनी वालिया (Scientist Kamini Walia)
यांच्यानुसार रूग्ण मोठ्या कालावधीपर्यंत हॉस्पिटलमध्ये राहिल्याने रूग्णांना अँटिबायोटिक्सचा उच्च डोस दिला जातो जेणेकरून 10 दिवसानंतर जे इन्फेक्शन होणार आहे, त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

या दृष्टीने हॉस्पिटमध्ये जास्त काळ राहणार्‍या रूग्णांसाठी हा अभ्यास इशारा आहे. त्यांनी सांगितले सुपरबगच्या हल्ल्यानंतर रूग्णांना अँटीबायोटिक्सचा हेवी डोस देणे आवश्यक होते, यामुळे कोरोनानंतर दुसर्‍या इन्फेक्शनशी लढत असलेल्या 52.36 टक्के रूग्णांना अँटीबायोटिक्सचा हेवी डोस दिला गेला आहे.

 

Also Read This : 

 

संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी सुचवले 3 पर्याय, म्हणाले…

 

घरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया

 

Pune : पुण्यात शनिवार अन् रविवारच्या कडक निर्बंधामध्ये शिथीलता, सकाळी 7 ते 11 च्या दरम्यान उघडी राहणार ‘ही’ दुकाने

 

शुगर कंट्रोल करणे नाही अशक्य, फक्त हवामानानुसार बदला स्वतःचं रूटीन, जाणून घ्या

 

Pune : …तर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण फी माफ करावी, भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी

 

Benefits of Curd : दह्यात मिसळून खा ‘या’ 10 वस्तू, कॅन्सर, डायबिटीज, बद्धकोष्ठता, प्रोटीनच्या कमतरतेपासून होईल बचाव