पद्मिनी कोल्हापुरेंचा मुलगा प्रियांकचा झाला साखरपुडा, ‘ही’ बनणार सुनबाई

पोलिसनामा ऑनलाइन – एकेकाळची गाजलेली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा हा बोहल्यावर चढण्यास सज्ज आहे. प्रियांकने निर्माता करीम मोरानीची मुलगी शजा मोरानी हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शजा मोरानी ही असिस्टंट डायरेक्टर आहे. ‘ऑलवेज कभी कभी’, ‘हॅपी न्यू इअर’ यासारख्या सिनेमात तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं .यावर्षी सुरुवातीला शजा, तिची बहीण जोआ आणि वडील करीम मोरानी यांना कोरोना झाला होता. त्यांना अनेक दिवस रूग्णालयात राहावं लागलं होतं.

प्रियांक शर्मा हा अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मावसभाऊ आहे. श्रद्धाचा भाऊ सिद्धांतने प्रियांकच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला. दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जगातील माझ्या सर्वात आवडत्या दोन व्यक्ति लग्नबंधनात अडकणार आहेत. मी खूप आनंदी आहे,’ असे सिद्धांतने लिहिलं आहे. प्रियांकचा साखरपुडा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. येत्या जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यात हे कपल लग्न करणार, असं मानलं जात आहे. प्रियांकने नुकताच बॉलिवूड डेब्यू केला होता. ‘सब कुशल मंगल’ या सिनेमात तो दिसला होता.

दरम्यान, बॉलिवूड आणि टीव्हीचे अनेक सेलिब्रिटींनी २०२० या वर्षांत लग्नगाठ बांधली. नेहा कक्कर, आदित्य नारायण, पुनीत पाठक, क्रिकेटपटू युजवेंद्र चहल अशा सगळ्यांचे शाही विवाह सोहळे या वर्षात पार पडले. आता लवकरच गौहर खान लग्नबंधनात अडकणार आहे.