गेल्या 6 वर्षात ‘कंगाल’ झाला पाकिस्तान ! नेपाळ, भुतान पेक्षाही पिछाडीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये सध्या महागाई खूपच वाढत चालली आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे जर हे असेच सुरु राहिले तर पाकिस्तानची हालत थोड्याच दिवसात नेपाळ आणि भुतांन पेक्षाही खूप खराब होऊ शकते. एशियन डेवल्पमेंट बँकेने दिलेल्या रिपोर्टनुसार दक्षिण आशियातील देशांपैकी पाकिस्तानचा जीडीपी सर्वात कमी असणार आहे. 2019 – 20 मध्ये हा जीडीपी रेट 2.8 % इतका राहू शकतो आणि हा गेल्या सहा वर्षातील सर्वात निच्चांकी आहे.

श्रीलंका आणि भुतानपेक्षाही कमजोर झाला पाकिस्तान
पाकिस्तानी एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण आशियातील देशांपैकी पाकिस्तानची ग्रोथ सगळ्यात कमी असणार आहे. या वर्षी अफगाणिस्तानची जीडीपी ग्रोथ 3.4 % श्रीलंका 3.5 %, भूतान 6 %, मालदीव आणि नेपाळची 6.3 %, भारताची 7.2 % आणि बांग्लादेश जीडीपीच्या बाबतीत 8 % असणार असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे.

महागाईमुळे हैराण सर्वसामान्य
ADB ने सांगितले की महागाईमुळे सर्वसामान्य माणसाला आराम मिळणार नाही. पाकिस्तानात सुरु असलेले चलन आणि महागाई दर 12 % च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे आणि महागाई 11 % वर येऊन पोहचली आहे.

पाकिस्तानची हालत अशी का आहे
ADB ने दिलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानचा आर्थिक स्तर खालावत चालला आहे. पाकिस्तानच्या चुकीच्या आणि कमजोर निर्णयांमुळे हा तोटा होत आहे. जोपर्यंत आर्थिक कमजोरी सुधरवली जात नाही तोपर्यंत पाकिस्तानची परिस्थिती ढासळतच राहणार. महागाईमुळे चलन व्यवस्थेवर दबाव निर्माण झालेला असणार. त्यासाठी विदेश गुंतवणुकीची आवश्यकता असणार आहे.