पाकिस्तानी नागरिकांना भेडसावतेय ‘अन्ना’ची चिंता, कशी साजरी करणार ‘ईद’ अन् मुलींचे विवाह होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा केल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात महागाई पसरली असून त्यांनी आपल्या देशातील नागरिकांना संकटाच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे आता सोमवारी साजरी होणारी बकरी ईद कशी साजरी करायची असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला आहे.

घाईगडबडीत पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वात मोठा फटका सामान्य नागरिकांना बसला असून दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता. पाकिस्तानमधील व्यवसायिकांबरोबरच सामान्य नागरिकांना देखील यावेळी ईद साजरी करायला मिळणार कि नाही याची चिंता सतावत आहे. भारताबरोबरच व्यापार बंद केल्याने मोठ्या प्रमाणात वस्तूंचा तुटवडा जाणवत असून नागरिकांचे बजेट देखील हलले आहे. पाकिस्तानमधील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दूध, मटण आणि अन्य वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून भारताशी व्यापार बंद केल्याचा मोठा फटका आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे आता घर कसे चालवायचे असा प्रश्न आमच्यापुढे पडला आहे.

बाजारातील चमक नाहीशी

बाजारातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताबरोबर व्यापार बंद केल्याने मोठ्या प्रमाणात याचा फटका बसलेला दिसून येत असून बकरी ईदला ३ ते ४ दिवस शिल्लक राहिले असताना देखील नागरिक खरेदीसाठी बाहेर पडलेले दिसून येत नाहीत. भाजीपाला आणि कांद्यासाठी पाकिस्तानला भारतावर निर्भर राहावे लागत आहे. आणि ईदसाठी ते सर्वात महत्वाचे सामान असल्याने सामान्य नागरिक मोठ्या चिंतेत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये कांद्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिक पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.

लग्न देखील धोक्यात

पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितल्यानुसार पाकिस्तान सध्या कांदा, टोमॅटो आणि केमिकलसाठी संपूर्णपणे भारतावर निर्भय आहेत. त्यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये या वस्तूंचे भाव मोठ्या वाढले असून भारताबरोबर व्यापार बंद केल्याचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ईदनंतर सुरु होणाऱ्या लग्नाच्या सीझनवर देखील यामुळे संकट आले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना याची देखील चिंता मोठ्या प्रमाणात सतावत आहे.

भारताचे काहीही नुकसान होणार नाही

व्यापार बंद करण्याच्या पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारताला काहीही तोटा होणार नसून मागील तीन वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा बंद आहे. जवळपास १८ हजार कोटी रुपयांचा व्यापार दोन्ही देशांमध्ये होत होता. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापार झाला नव्हता. त्यामुळे भारतावर काहीही परिणाम होणार नसून पाकिस्तानमध्ये मात्र दैनंदिन वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढणार असून महागाई देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यामध्ये कांदे, टोमॅटो आणि केमिकल्सचा समावेश आहे. या सगळ्या गोष्टी भारतामधून मोठ्या प्रमाणावर आयात करत असतो.

या वस्तूंची होते सध्या आयात निर्यात

भारत आणि पाकिस्तनमध्ये सध्या साखर, चहा पावडर, कापूस, रबर, तेल, यांसारख्या प्रमुख वस्तूंसह १४ वस्तू निर्यात होतात. त्याचबरोबर भारत पाकिस्तानकडून एकूण १९ वस्तूची आयात करत असून यामध्ये पेरू, आंबे, अननस, साइक्लिक हाइड्रोकॉर्बन, पेट्रोलियम गॅस, पोर्टलॅंड सीमेंट, कॉपर वेस्‍ट, कॉटन यॉर्न यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.

आता काय होणार

२०१८-१९ मध्ये जुलै ते जानेवारी या महिन्यांमधील भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार थोडा वाढून १. १२२ अरब रुपयांपर्यन्त पोहोचला होता. भारताची २०१५-१६ मधील भारताचा पाकिस्तानबरोबर व्यापार हा ६४१ अरब डॉलरचा झाला होता. तर पाकिस्तानचा केवळ २. ६७ अरब डॉलरचा होता. त्यामुळे पाकिस्तानच्या या निर्णयामुळे त्यांना सर्वात जास्त तोटा होणार असून भारताला याचा काहीही फरक पडणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –