नोबेल पारितोषिक विजेत्या ‘मलाला’स PAK दहशतवाद्याकडून धमकी, म्हटले – ‘यावेळी चुक होणार नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा समोर आला आहे. नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसुफजईला पुन्हा त्याच दहशतवाद्याने धमकावले आहे ज्याने 2012 मध्ये तिच्यावर हल्ला केला होता. त्याने ट्विटरवर म्हटले की, यावेळी कोणतीही चूक होणार नाही. अखेर अटक केलेला दहशतवादी कोठडीतून कसा पळाला, याबद्दल मलालाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सैन्य यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला आहे.

ताब्यातून पळून गेला हशतवादी
मलाला म्हणाली की, हा माझ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणार्‍या तहरीक-ए-तालिबानचा माजी प्रवक्ता आहे. 2012 मध्ये मलाला युसुफजाईवर हल्ला झाला होता, ज्याचा दावा तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेच्या एहसानुल्ला एहसानने केला आहे. एहसानला 2017 मध्ये अटक करण्यात आली होती, परंतु 2020 मध्ये तो ताब्यातून सुटला. आश्चर्याची बाब म्हणजे
त्याच्या सुटकेची अद्याप पाकिस्तानी सैन्याकडून पुष्टी झालेली नाही . आता त्याच्या खुल्या धमकीने अतिरेकी आणि सैन्य यांच्यातील संबंध उघडकीस आणले आहेत. कोठडीतून बाहेर आल्यानंतर त्याने आपले विधान व्हिडिओवरून प्रसिद्ध केले.

तालिबानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मलाला
मलालाने मुलींच्या शिक्षणासाठी मोहीम राबविली, तेव्हापासून ती तालिबानी अतिरेक्यांचे लक्ष्य आहे. 2014 मध्ये सैन्य पब्लिक स्कूलवर झालेल्या हल्ल्यातही एहसान दोषी आहे, ज्यामध्ये 134 मुले ठार झाली होती. मलालाच्या धमकीविरोधात विरोधी नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत इम्रान सरकारवर निशाणा साधला आणि सरकारला पूर्णपणे अक्षम म्हटले. मलालाला धमकी दिल्यानंतर ट्विटरने या दहशतवाद्याचे खाते कायमचे बंद केले आहे.