अरे देवा ! इम्रान खान आणि परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ‘पाक’च्या नागरिकांना मुर्ख बनवलं

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – एका पाठोपाठ एक कुरापती करणाऱ्या पाकिस्तानच्या अनेक हरकती समोर येताना दिसत आहेत. काश्मीर प्रति पाकचा सूरही मंदावताना दिसत आहे. परंतु सध्या जे काही झालं आहे त्यानंतर पूर्ण जगासमोर हे आलं हे की, काश्मीर प्रकरणी पाकिस्तानच्या हाय कमांडने आपल्या लोकांची दिशाभूल केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांसारखे उच्च पदावर असलेले लोक पाकिस्तानी जनतेला मुर्ख बनवण्याच्या कटात सहभागी आहेत.

हे सत्य समोर आल्यानंतर आता पाकचे पंतप्रधान इम्रान खान मीडियाच्या निशाण्यावर आले आहेत. इम्रान खान यांच्याशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताचे पीएम मोदी यांच्याकडे जो कल दिसून आला त्याला पाकच्या काही चॅन्सलने खुन्नस म्हटलं आहे.

पाकिस्तानी अँकरने विचारले, आम्ही ट्रम्पपवर विश्वास ठेवू शकतो का ?
एका पाकिस्तानी चॅनल जिओ न्यूजवरील चर्चेदरम्यान प्रसिद्ध अँकर हामिद मीर म्हणाले, आम्ही आता ट्रम्पवर विश्वास ठेवू शकतो का ? यावेळी हामिद मीर यांनी असंही म्हटलं की, ट्रम्प आणि मोदी यांनी ऐलान-ए-जंग केली आहे आणि पाकिस्तान यासाठी तयार आहे का ? पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणांसाठी ट्रम्पपासून धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

या कार्यक्रमात असेही म्हटले गेले होते की ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की मुस्लिम अतिरेकी आहेत आणि ते हिंदूंचे मित्र आहेत. वास्तविक, ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटले होते की हिंदू माझे मित्र आहेत आणि हाउडी मोदी कार्यक्रमात त्यांनी कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाविरूद्ध कटिबद्धता व्यक्त केली होती, जी पाकिस्तानात ऐलान-ए-जंग म्हणून सादर केली गेली.

Visit : policenama.com