पाकची धमकी : एकाच्या बदल्यात १० सर्जिकल स्ट्राईक करू

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

भारताने एक जरी सर्जिकल स्ट्राईक केले तरी प्रत्युत्तरात आम्ही १० सर्जिकल स्ट्राईक करू, अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तान लष्कराच्या पब्लिक रिलेशन्सचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी लंडन येथे पत्रकारांशी संवाद साधताना ही धमकी दिली आहे. गफूर हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमार जावेद बाजवा यांच्यासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7a7df8f7-cf66-11e8-bb64-954d9403731d’]

भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचे धाडस केले, तर त्यांना प्रत्युत्तरात १० सर्जिकल स्ट्राईकला सामोरे जावे लागेल, असे रेडिओ पोकिस्तानने जनरल असिफ गफूर यांचा हवाला देताना म्हटले आहे. आमच्या बद्दल जे वाईट विचार करतात, त्यांच्या मनात पाकिस्तानच्या क्षमतेबद्दल शंका नसावी, असेही गफूर यावेळी म्हणाले.

[amazon_link asins=’B07F87SG8J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8e50e527-cf66-11e8-85ae-3732cc978e91′]

अलाहाबाद लवकरच होणार प्रयागराज : योगी

अलाहाबाद : कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलाहाबादचे नाव लवकरच प्रयागराज होणार आहे, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. अलाहाबाद येथे कुंभमेळा मार्गदर्शक मंडळाची बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री योगी म्हणाले, अलाहाबादमध्ये गंगा आणि यमुना या दोन पवित्र नद्यांचा संगम होतो. त्यामुळे अलाहाबाद सर्व प्रयागांचा राजा आहे. म्हणून याला प्रयागराज म्हटले जाते. याचे नाव बदलून प्रयागराज व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे. यावर जर व्यापक सहमती  झाली, तर आपण या शहराल  प्रयागराज नावानेच ओळखायला हवे.  अलाहाबाद येथे १५ जानेवारी २०१९ पासून कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. या कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या फलकांवर अलाहाबाद ऐवजी प्रयागराज, असे लिहिण्यात आल्याचे काही माध्यमांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकार पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वीच अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद द्यावा : अशोक चव्हाण