अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘अनेक अभिनेत्रींनी माझे लैंगिक शोषण केले’

पोलीसनामा ऑनलाईन – फिल्म इंडस्ट्रीत होणा-या कास्टिंग काऊचबाबत पाकिस्तानी अभिनेता अजफर रेहमान याने धक्कादायक खुलासा केला आहे. आपले काही अभिनेत्रीनी लैंगिक शोषण केल्याचा दावा त्याने केला आहे. त्याच्या या वक्तव्याने खळबळ उडाली असून सोशल मिडियावर चर्चा होत आहे.

एका चॅनलने घेतलेल्या मुलाखतीत अभिनेता अजफरने हा दावा केला आहे. यावेळी त्याने लैंगिक शोषण, मी टू मोहीम, कास्टिंग काऊच आणि या चंदेरी दुनियेत मिळणा-या विविध ऑफर यावर चर्चा केली. घरच्यांना विरोध करून आपण या क्षेत्रात आलो. इंडस्ट्रीत नाव कमावण्यासाठी 15 वर्ष कठोर मेहनत केली आहे. या काळात अनेक तडजोडी कराव्या लागल्याचे त्याने सांगितले. आपल्याला या इंडस्ट्रीत आलेल्या अनुभावावर आपण एक पुस्तक लिहणार असल्याचेही त्यांने सांगितले. आपण कधीही काम मिळविण्यासाठी दिग्दर्शकाकडे गेलो नाही. आपल्या अभिनय क्षमतेमुळेच आपण इथपर्यंत पोहचल्याचे त्यांनी सांगितले. या काळात अनेक ऑफर्सही आपल्याला मिळाल्या.पण त्याकडे दुर्लक्ष करून आपण हा टप्पा गाठल्याचे तो म्हणाला.

या क्षेत्रात कास्टिंग काऊच अनेक वर्षापासून होत आहे आणि पुढेही ते होत राहणार. आपण याचे समर्थन करत नाही. मात्र हे सत्य असल्याचे त्याने सांगितले. मी टू मोहीम हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. कोणत्याही क्षेत्रात लैंगिक शोषण होणे हे अयोग्य आहे. या क्षेत्रात अनेक महिला कलाकारांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा दावाही त्याने केला. आपण त्यांची नावे जाहीर करणार नाही. आता आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. ते आयुष्यातील वाईट अनुभव होते असेही त्यांने सांगितले. महिलांची समाजातील प्रतिमा आणि त्यांचे स्थान लक्षात घेता पुरुषांकडून होणारे असे आरोप हसण्यावरी नेले जातात, असा खेदही त्याने व्यक्त केला.