पाकिस्तानी समर्थकांकडून लंडनमध्ये ‘घाणेरडं’ कृत्य, भारतीय उच्चायुक्‍त कार्यालयावर फेकले ‘अंडे-दगडं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून आता इतर देशांमध्येही परिणाम दिसून यायला सुरुवात झाली आहे. लंडन येथील पाकिस्तानी नागरिकांनी भारताविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी केलेल्या आंदोलनात लंडनमधील रास्त्यावर चांगलीच तोडफोड केली.

या निदर्शनादरम्यान लंडनमधील भारतीय उच्चायुक्ताला पाकिस्तानी नागरिकांनी लक्ष्य केले होते निदर्शकांनी भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीत अंडी, टोमॅटो, शूज, दगड, धूर बोंब आणि बाटल्या फेकल्या यापूर्वी १ ऑगस्ट रोजी शांततापूर्वक स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते.

काश्मिर प्रकरणावरून मंगळवारी पाकिस्तानी वंशाच्या आंदोलकांनी लंडनमध्ये पुन्हा एकदा निषेध केला आणि भारतीय उच्चायुक्तांना लक्ष्य केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकविसाव्या शतकातील हिटलर आणि दहशतवादी म्हणत हजारो पाकिस्तानी ब्रिटिश निदर्शकांनी भारतीय उच्चायुक्तालयाकडे कूच केली आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी घोषणाबाजी केली. आपण काश्मिरातील लोकांना शांत करू शकत नाही असा निरोप आम्हाला नरेंद्र मोदींना पाठवायचा आहे, असे निदर्शकांनी सांगितले.