Palak Tiwari | पलक तिवारीच्या पिवळ्या रंगाच्या साडीवर चाहते लट्टू; फोटोवर कौतुकांचा वर्षाव
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Palak Tiwari | श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी खूपच लोकप्रिय आहे. पलकने अजून तरी तिच्या अभिनयाचे कौशल्य दाखवले नसले तरी देखील तिच्या स्टाईलमुळे ती ओळखली जाते. आईप्रमाणे अगदी कमी वयातच तिने तिची खास ओळख निर्माण केली आहे. पलक तिच्या स्टाईलने आणि आकर्षक लूकमुळे सर्वांवरच जादू करत असते. पलक सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. तिचे विविध लुक मधील फोटो चाहत्यांसाठी ती नेहमीच शेअर करत असते. (Palak Tiwari)
पलकने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही फोटोज शेअर केले आहे. ते सध्या वायरल होताना दिसत आहेत. जे सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. पलकने अभिनय क्षेत्रात जरी पाऊल ठेवले नसले तरी तिचे चाहते वर्ग मात्र मोठ्या प्रमाणात आहेत. पलकने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये तिच्या ॲक्टची कमाल लोकांपर्यंत पोहोचवली आहे. (Palak Tiwari)
दररोज पलक तिचे नवनवीन लूक इंस्टाग्राम वर शेअर करत असते. त्यावर चाहते देखील कमेंटचा वर्षाव करायला विसरत नाहीत. पलकने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एथनिक लुक मध्ये दिसत आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये पलकने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. या दोन्ही फोटोमध्ये पलक खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. यावर तिने न्यूड मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत. पलकच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘रोझी – द केफ्रॉन चॅप्टर’ मध्ये झळकणार आहे.
Web Title :- Palak Tiwari | bollywood actress palak tiwari shared new photos in ethnic ware
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Devendra Fadanvis | नाशिक पदवीधर निवडणूकीत देवेंद्र फडणवीस यांनीच केला काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम?