Palak Tiwari | श्वेता तिवारी पलकला जाऊन देत नव्हती वयाच्या 15 व्या वर्षी डेटिंगला

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री श्वेता तिवारी व मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) अनेकदा सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये असतात. पलक ही सध्या लाईमलाईटमध्ये असते. पलकने नुकतेच सलमान खानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. श्वेता व पलक या नेहमी त्याचे नवनवीन हॉट फोटोशूट (Shweta Tiwari Hot Photoshoot) सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे दोन्ही मायलेकी चर्चेचा विषय बनलेल्या असतात. पलकने (Palak Tiwari) एका मुलाखतीमध्ये तिच्या पहिल्या प्रेमाविषयी व त्यावेळी तिच्या आईने तिला डेटिंगवर पाठवले नव्हते याविषयी शेअर केले आहे.

पलक तिवारी ही सोशल मीडियावर सक्रीय असते. पलक केवळ 22 वर्षांची असून एकाच चित्रपटामध्ये तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. एका मुलाखतीमध्ये पलकने तिच्या अवघ्या 16 वर्षांत झालेल्या प्रेमाबद्दल व तिच्या आईने तिला पकडले होते याबद्दल सांगितले. जर ती डेट (Palak Tiwari Dating) वर जायला लागली तर तिची आई श्वेता तिला बरोबर पकडत असतं. व युक्त्या करत तिला डेटवर जाऊ देत नसतं.

पलकने सांगितले की, “माझी सर्वात मोठी अडचण ही होती की मी खूप खोटं बोलायचे आणि लोक मला बरोबर पकडायचे. माझी आई म्हणायची तू खोटं बोलण्याचा प्रयत्न तरी का करते?” मी खोटं बोलले तर दोन तासात पकडले जायचे. जेव्हा मी 15 किंवा 16 वर्षांची होते तेव्हा माझा एक बॉयफ्रेंड होता. जसे की शाळेमध्ये एक बॉयफ्रेंड असतो तसा आणि मग आम्ही मॉलमध्ये फिरायला जायचो. असचं मी एकदा त्याच्यासोबत मॉलमध्ये फिरायला जाणार होते आणि मी माझ्या आईला सांगितले की मी लपाछपी खेळायला खाली जात आहे. आई म्हणाली ठीक आहे. ती तेव्हा शहरात नव्हती आणि मग नंतर ते तिला समजले की मी खाली खेळत नाहीये आणि मॉल मध्ये गेले आहे. तिला याचा खूप राग आला. गंमत म्हणजे माझी आई मला तेव्हा म्हणायची, मी तुला गावीच पाठवून देते किंवा तुझे केस कापून टाकेल.”

अभिनेत्री पलक (Palak Tiwari) ही तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. अनेकदा ती सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) सोबत फिरताना दिसत असते. अनेकदा त्या दोघांना फिरताना पापाराझी कॅमेऱ्यात कैद करतात. पलकला तिच्या व इब्राहिमच्या (Palak Tiwari And Ibrahim) नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली की, मी आणि इब्राहिम फक्त खास ओकेजनलाच भेटतो. काही कार्यक्रम किंवा इव्हेंट असेल तर आम्ही भेटतो. खूप कधीतरी आम्ही रेग्लुवर बेसिसवर आम्ही भेटत नाही. असे तिने तिच्या व इब्राहिमच्या नात्याबद्दल सांगितले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ranveer Singh | रणवीर सिंग झाला होता नापास; ‘या’ विषयात मिळाले होते शून्य मार्क