Palghar ACB Trap | 1 लाख रुपये लाच घेताना पालघर महावितरण विभागाच्या महिला अधीक्षक अभियंत्यासह कार्यकारी अभियंता अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघरच्या महावितरण विभागाच्या (MSDCL) महिला अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) किरण हरीश नागावकर Kiran Harish Nagaonkar (वय-45) व कार्यकारी अभियंता प्रताप हरचंद मचिये Executive Engineer Pratap Machiye (वय-50) या दोघांना लाच घेताना (Accepting Bribe) पालघर एसीबीच्या पथकाने (Palghar ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. ही करवाई पालघर एसीबीच्या पथकाने (Palghar ACB Trap) सोमवारी (दि.26) प्रताप मचिए यांच्या कार्यालयात केली.

 

याबाबत 37 वर्षीय तक्रारदार यांनी पालघर एसीबीकडे (Palghar ACB Trap) बुधवारी (दि.21) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्यावर महावितरण अंतर्गत दोन ते तीन तक्रारी दाखल असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी या दोघांनीही दोन लाख रुपये लाच मागितली. परंतु तक्रारदार यांनी लाचेची रक्कम जास्त असल्याचे सांगत तडजोडी नंतर दीड लाख करण्यात आली.

यानंतर पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा व पडताळणी केली. पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ठरलेल्या रकमेपैकी एक लाख रुपये लाच घेताना प्रताप मचिए यांना त्यांच्या कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले. यानंतर किरण नागावकर यांना ताब्यात घेण्यात आले.

 

ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप (DySP Navnath Jagtap),
पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास (Police Inspector Swapan Biswas),
पोलीस हवालदार अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर,
दीपक सुमडा, नवनाथ भगत आणि पोलीस नाईक सखाराम दोडे आणि स्वाती तारवी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Palghar ACB Trap | Women Superintending Engineer and Executive Engineer of Palghar Mahavitaran Division caught in anti-corruption net while taking Rs 1 lakh bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

Income Tax Alert! जर बहुतांश व्यवहार कॅशने करत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकते नोटीस, जाणून घ्या नियम

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स