वारकर्‍यांचा पहिला ग्रामीण मुक्‍काम लोणी काळभोरमध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥
संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥
तुका ह्मणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥

अंगावर पावसाच्या धारा झेलत ज्ञानोबा-तुकोबारायांच्या जयघोषात विठ्ठल – रुक्‍मिणीच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वैष्णवांचा पालखी सोहळा संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात विसावला. संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे शहरातील मुक्काम उरकून लोणी काळभोर (ता. हवेली ) येथे मुक्कामासाठी शुक्रवारी (ता. २८ ) पोहोचली.

मांजरी बुद्रुक येथील दुपारचा विसावा उरकून पालखी पाच वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) गावाच्या हद्दीत कवडीपाट टोलनाका येथे पोचली. यावेळी हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, चित्तरंजन गायकवाड, उपसरपंच ऋषिकेश काळभोर, व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. छत्रपती ग्रुप तर्फे बिस्किट वाटप करण्यात आले. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत रांगा लावून दर्शन घेतले.

लोणी स्टेशन परिसरातील कला संस्कृती ग्रुप अकॅडमी वाडगाव शेरी पुणे यांनी पालखी स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढली होती. यावेळी विश्वराज हॉस्पिटलने सर्व आजारांची तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर घेतले. एमआयटी कॉर्नर येथे लातूर अर्बन बँकेने वारकऱ्यांसाठी उपवासाच्या साहित्याचे वाटप केले.

Video : अभिनेत्री कंगनाने ‘तेरे जिस्म २’ गाण्यावर दाखवला बोल्ड ‘अवतार’

‘या’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये ‘एन्ट्री’ करणार ‘चिक्कू’ ऋषी कपूर !

मराठा आरक्षण मागासवर्गीय आयोगाच्या अहवालामुळे न्यायालयात ‘टिकलं’

यापैकी १ % आरक्षण कमी करून अनाथांना द्या – बच्चू कडू

घरातल्या या मसाल्याने रात्रीतून पिंपल्स होईल गायब …

केसांना ‘डाय’ करताय ? मग आधी हे वाचा, आणि लक्षात ठेवा