PAN Card-Aadhar Card | पॅन कार्ड-आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अडचण येते का ? मग ‘हे’ काम करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नागरीकांचे महत्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आहे. त्याचबरोबर पॅन कार्ड (PAN Card) देखील सध्या महत्वाचे डाक्युमेंट आहे. अनेक खासगी आणि सरकारी कामासाठी आधार कार्डची आवश्यकता लागते. दरम्यान, पॅन कार्ड आधार कार्डला (Aadhaar Card) जोडण्याची अखेरची तारीख जवळ आली आहे. मात्र, अनेक नागरीकांना अजुनही आधार-पॅन लिंक (PAN Card- Aadhaar Card Link) करण्यासाठी अडचण येत आहेत. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी पॅन कार्ड धारकांना 31 मार्च 2022 ही तारीख आहे. तर लिंक करण्यासाठी काय समस्या येते ? त्याचे कारण काय ? याबाबत जाणून घ्या. (PAN Card-Aadhar Card)

 

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी नाव, जन्मतारीख, ओटीपी मिळवण्यासाठी मोबाइल नंबर यासारखे डिटेल्स दोन्ही डॉक्युमेंट वर मॅच होत नसतील, तर युजर्सला दोघांच्या लिंकसाठी समस्या येऊ शकणार आहेत. (PAN Card-Aadhar Card)

 

पॅन कार्डवरील डिटेल्स मॅच होत नसतील, तर टॅक्सपेयर्स संबंधित अथॉरिटीकडे याबाबत मदत मिळू शकते. इथे पॅन कार्डसंबंधी कोणतीही माहिती मिसमॅच असेल, तर लगेच बदल केले जातात आणि ही समस्या सोडवली जाते. आधार कार्ड युजर्स आधार सेवा केंद्रात (Aadhaar Seva Kendra) जाऊन वेबसाइटच्या माध्यमातून सविस्तर अपडेट करु शकणार आहे.

 

UIDAI ने आधारसंबधी नवी सुविधा देण्याचा विचार केलाय. आता रुग्णालयातच नवजात बाळाचं आधार कार्ड तयार करण्याची सुविधा दिली जाण्यावर विचार सुरूए. सध्या नवजात बाळाच्या आधार कार्डसाठीची (New Born Baby Aadhaar Card) सुविधा रुग्णालयात उपलब्ध नाही. रुग्णालयाच्या डिस्चार्ज स्लिपच्या माध्यमातून लहान मुलांच आधार कार्ड तयार करावं लागतं. त्यासाठी आधार सेंटरवर जावं लागतं. नवजात बाळाच्या जन्मावेळी, लगेच रुग्णालयातच आधार कार्डची सुविधा मिळाल्यास नागरीकांची मोठी मदत होईल. त्याचबरोबर बाळाचं आधार कार्ड देखील सहजपणे तयार होणार आहे.

 

असं लिंक करा पॅन – आधार –

Income Tax वेबसाइटवर जा.

आधारवर असलेलं नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर टाका.

आधार कार्डमध्ये केवळ जन्मतारीख दिली असल्यास समोर असलेल्या बॉक्सवर टिक करा.

आता कॅप्चा कोड एंटर करा.

आता Link Aadhaar वर क्लिक करा. त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.

 

Web Title :- PAN Card-Aadhar Card | pan aadhaar card linking problem this may reason check details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा