Pankaj Tripathi | ‘या’ कारणामुळे पंकज त्रिपाठी यांनी नाकारल्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर

पोलीसनामा ऑनलाईन : Pankaj Tripathi |आजकाल प्रेक्षक बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट यांच्यात तुलना करताना दिसत आहेत. आजच्या घडीला पाहता बॉलीवूड पेक्षा दाक्षिणात्य चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर जोरात कमाई करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना सुद्धा बॉलीवूड पेक्षा दक्षिणेतील चित्रपट आपलेसे वाटत आहेत. अशातच आता हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार सुद्धा यावर आपले मत मांडत आहेत. (Pankaj Tripathi)

गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना दाक्षिणात्य तसेच हॉलीवुड चित्रपटात काम करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “मी स्वतःवर कधीच भाषेचे बंधन येऊ दिले नाही. मात्र माझी पहिली पसंती ही हिंदीच आहे. हॉलिवूड सोडा पण मला तेलुगु आणि मल्याळम फिल्ममेकर्स कडूनही बऱ्याच ऑफर आल्या आहेत. पण मी त्या भाषेमध्ये दिवंगत नाही त्यामुळे मला असे वाटते की मी त्या चित्रपटांना तेवढा न्याय नाही देऊ शकत. हिंदी या भाषेतील बारकावे यातील भावना मला चांगल्या ठाऊक आहेत म्हणून मला हिंदी चित्रपटांचा जास्त कल आहे”. (Pankaj Tripathi)

याआधी पंकज यांनी हॉलिवूडस्टार क्रिस हॅम्सवर्थच्या ‘Extraction’ या हॉलिवूड चित्रपटात छोटीशी भूमिका
केली होती. तसेच पंकजने मिर्जापूर मध्ये साकारलेली ‘कालीन भैय्या’ ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडल्याचे
पहायला मिळाले. तर सध्या प्रेक्षक याच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title :-Pankaj Tripathi | why bollywood actor pankaj tripathi rejects south indian films calrifies in iffi in goa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | …म्हणून नात जावयाने केला 74 वर्षाच्या सासूच्या खूनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना

Megha Dhade | Bigg Boss विजेत्या अभिनेत्रीने शिव आणि विणाच्या नात्याबद्दल केले ‘हे’ मोठे वक्त्यव्य