पंकज उधास यांचे ‘गणेश भक्तीगीत‘ प्रकाशित

मुंबई : वृत्तसंस्था

गझलगायनासाठी प्रसिद्ध असणारे गायक पंकज उधास यांचे ‘जय गणेश’ नावाचे भक्तीगीत प्रकाशित करण्यात आले आहे. हे गाणे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरावर आधारित असून हे भक्तीगीत सीडीस्वरुपात देण्यात आले आहे.  या भक्तिगीताचे प्रकाशन प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात देवाच्या चरणी सीडी अर्पण करून करण्यात आले. सीडीतील हे भक्तीगीत श्री पंकज उधास यांनी श्री सिद्धीविनायक गणपतीला अर्पण केले आणि या सीडीचे प्रकाशन झाल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हजे गझलगायक पंकज उधास यांनी  पहिल्यांदाच गणेश भक्तीगीत गायले आहे.
जाहिरात

“मी गेली कित्येक वर्षे सिद्धीविनायकाची भक्ती करतो आहे. मला सिद्धीविनायकाच्या चरणी एक गाणे अर्पण करायचे होते आणि गेली कित्येक वर्षे ते मनात घोळत होते. आता या गाण्याच्या रूपाने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. मला पूर्ण खात्री आहे की, बाप्पाच्या सर्व भक्तांना माझी ही छोटेखाणी भेट नक्कीच पसंत पडेल”, असे उद्गार पंकज उधास यांनी काढले.

विशाल धुमाळ यांनी अत्यंत सुंदररित्या संगीतरचना केली असून गाण्याचे अर्थपूर्ण व भक्तिपूर्ण बोल श्री आलोक श्रीवास्तव यांनी लिहिले आहेत. व्हिडीओचे चित्रीकरण आशीष चौबे यांनी ‘स्टुडीओ 17’मध्ये केले असून आफ्ताब खान यांनी ‘हेडरूम स्टुडीओ’ येथे मिक्सिंग केले आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी