जिल्ह्याला बारामतीच्या दावणीला बांधऱ्यांना दारातही उभे करू नका : पंकजा मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – “राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पंधरा वर्षे सत्तेत असताना एक विट देखील उभी केली नाही. तेच लोक मी मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची हुजरेगिरी करून जिल्ह्याला बारामतीच्या दावणीला बांधणाऱ्यांना निवडणुकीच्या काळात दारातही उभा करू नका” असा टोला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला आहे.

अंबाजोगाई येथे २ कोटी २१ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तालुका पशुवैद्यकीय व पशुचिकित्सालयाच्या इमारतीचे उद्घाटन आणि केज तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ८० कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ रविवारी झाला. यावेळी त्या बोलत होत्या

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या ,” ठरवलं तर रोज पाचशे कोटी रुपयांच्या कामांची उद्घाटने करू शकते. मला फक्त विकासाचे राजकारण करायचे आहे. त्यामुळे मी केलेल्या विकास कामांची निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटने करण्याचा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनकडून करण्यात येत आहे मागच्या १५ वर्षांपासून सत्तेत असताना एक वीट देखील उभा करता आली नाही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची हुजरेगिरी करुन जिल्ह्यला बारामतीच्या दावणीला बांधणाऱ्यांना दारातही उभा करू नका असा हल्ला करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा थेट नामोल्लेख टाळून टोला लगावला.

यावेळी आमदार संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, सभापती संतोष हांगे, जिल्हा परिषद सदस्या डॉ.योगिनी थोरात आदि उपस्थित होते. या वेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी साडेचार वर्षांत आपण वर्षांनुवर्ष टिकेल अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे.