Pankaja Munde | ओबीसी मेळाव्याला न जाण्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले कारण, ”कोणी जायचे हे पक्षाने आधीच ठरविलेले”

मुंबई : अंबड, जालना येथे काल ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचाव एल्गार सभा झाली. या सभेला पंकजा मुंडे (Pankaja Munde) उपस्थित राहणार होत्या. त्यांचे असंख्य कार्यकर्ते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची छायाचित्रे असलेले फलक घेऊन आले होते. परंतु, सभेला पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. यावर आता स्वत: पंकजा यांनी खुलासा करत, पक्षाच्या एका आदेशामुळेच येता आले नाही, असे म्हटले आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, पक्षाने या सभेला कोणी जायचे हे ठरविले होते. तसेच आजचा पीच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा होता, त्यामुळे मी या ठिकाणी गेले नाही. मला ओबीसींच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण, मानपान देण्याची गरज नाही. बहुजनांच्या संघर्षासाठी निमंत्रणाची गरज नाही. मी माझी ओबीसी आरक्षणावर भुमिका आधीच मांडलेली आहे.

दरम्यान, कालच्या जालन्याच्या ओबीसी एल्गार सभेत राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group)
नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange)
यांच्यावर खालच्या पातळीची वैयक्तिक टीका केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी ट्विटरवर पोस्ट करून केली आहे.

जालन्याच्या ओबीसी एल्गार सभेला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar),
महादेव जानकर (Mahadev Jankar), आ. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), प्रकाश शेंडगे (Prakash Shendge),
नारायण मुंडे, बबनराव तायवाडे, आ. राजेश राठोड, देवयानी फरांदे व इतर ओबीसी नेते उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिवसेनेचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार, राज्यातील स्थिती आणि आरक्षणाबाबत करणार महत्वाची मागणी