Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या भाषणावर भाजपा मंत्र्याची पहिली प्रतिक्रिया, पण…

मुंबई : राष्ट्रसंत भगवान बाबा (Bhagwan Baba) यांचे जन्मगाव, सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या उपस्थितीत मंगळवारी दसरा मेळावा (Dussehra Melava) झाला. या मेळाव्यात बोलताना पंकजा (Pankaja Munde) यांनी थेट पक्ष नेतृत्व आणि स्वपक्षाच्या सरकारवरच निशाणा साधला. आता प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा असे कोणी म्हणणार असेल तर ते चालणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी स्वपक्षाला दिला. तसेच राज्यातील शेतकरी, विविध समाज घटकांच्या आरक्षणाचा मुद्दा आणि ऊसतोड कामगार इत्यादी प्रश्न गंभीर झाल्याचे म्हणजे त्यांनी सरकारला लक्ष्य केले. यावर भाजपाकडून (BJP) पहिली प्रतिक्रिया आली आहे.

पंकजा मुंडे यांच्या भाषणाबद्दल भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांना प्रश्न विचारला असता
ते म्हणाले, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जे वक्तव्य केल ते पक्षाच्या संदर्भात नसेल.
मी नेमकं त्यांच भाषण ऐकले नाही. ऐकल्यानंतर काय ते बोलता येईल, असे महाजन म्हणाले. एकंदरीत गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी काल भाजपावर केलेल्या टिकेला उत्तर देताना
गिरीश महाजन म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले आहे.
सरसंघचालकांनी आमच्यासोबत यावे, असे राऊत यांनी म्हणणे म्हणजे वेड्या माणसाने बरळण्यासारखे आहे.
वाटेल तसे, वाटेल ते बोलायचे. त्यामुळे या माणसाच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे, असे सर्वपक्षीय लोकांचे एकमत झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thackeray Group On CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे हे स्वतः हमास, उद्धव ठाकरे गटाने दसरा मेळाव्यातील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

BJP Ashish Shelar On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची टीका भाजपा नेत्यांच्या जिव्हारी, शेलार म्हणाले – ‘आता काँग्रेसी हृदयसम्राट बालिशसाहेबांचे…’