Pankaja Munde On Maratha Reservation | ‘मराठा समाजाला शब्द नको, त्यांना खरं आरक्षण हवंय’, पंकजा मुंडेंकडून भूमिकेचा पुनरुच्चार

धाराशिव : पोलीसनामा ऑनलाइन – Pankaja Munde On Maratha Reservation | मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापू लागला आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Caste Certificate) देण्याची मागणी जरांगे यांनी लावून धरली आहे. तर दुसरीकडे सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला आहे. यावरुन चर्चेच्या फेऱ्या सुरु असताना दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावरुन आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्या धाराशिव (Dharashiv) मध्ये बोलत होत्या. (Pankaja Munde On Maratha Reservation)

मराठा समाजाला शब्द नको…

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी वारंवार पोटतिडकीने सांगत आहे की मराठा समाजाला शब्द नको आहे. मराठा समाजाला दिशाभूल नको आहे. त्यांना खरं आरक्षण पाहिजे आहे. हे आरक्षण किती बसेल, कसं बसेल याचा आराखडा सरकारकडे असतो. त्यांनी ते विश्वासाने व हिंमतीने त्यांच्याशी चर्चा करुन करायला पाहिजे असं मला वाटतं. (Pankaja Munde On Maratha Reservation)

त्यांनी म्हटलं नाही ओबीसीतून आरक्षण द्या

त्यांनी असं कधीच म्हटलं नव्हतं की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. ते म्हणाले होते की आम्हाला आरक्षण द्या. त्यांना वेगळा गट करुन आरक्षण दिलंही. परंतु ते कोर्टात टिकलं नाही. त्यांचं आरक्षण सुरक्षित करण्याचा मार्ग केवळ प्रसासन, शासन व न्यायालयाकडे आहे. त्यांनी तो करवा, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

ही फक्त दिशाभूल चालू आहे

लोकांना एका वर्गातून दुसऱ्या वर्गात टाकण्यासाठी वंशावळी बघूनच निर्णय घेता येईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मराठा आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी नेहमीच समर्थन दिले आहे. कुणबी प्रवर्ग ओबीसींमध्ये नको असं म्हणताच येत नाही. ही फक्त दिशाभूल चालू आहे. त्यामुळे मराठा व ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे वाटू लागलं आहे, असं मुंडे यांनी यावेळी म्हटले.

कोण म्हणेल आमच्या वर्गात आरक्षण द्या

प्रत्येक वर्ग आपापल्या ठिकाणी आहेच. त्यांना दुसऱ्या वर्गात कसं टाकता येईल? त्यांची वंशावळ बघावी लागेल.
तेव्हा कोणती जात लावत होते हे बघावं लागेल. तेव्हा ओबीसींमध्ये नव्हते तर ते टाकणं हे सोपं नाही.
ओबीसींचा आरक्षणाला पाठिंबा आहे. परंतु कोणता वर्ग असं म्हणेल की आमच्या वर्गात त्यांना आरक्षण द्या,
असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला. तसेच त्यांना अस्वस्थ करुन पुन्हा दोन वर्गांमध्ये भांडण लावून तिसरी माणसं
बघत बसणार हे महाराष्ट्राला अजिबात नको आहे. महाराष्ट्राला शांतता व स्थैर्य पाहिजे.
त्यामुळे मराठा व ओबीसी समाजातील वादाचा कोणताही विषय नाही. त्यात स्पष्टता आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मी मोठा पोलीस अधिकारी.. महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध; 35 लाख रुपये उकळणाऱ्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला अटक