Pankaja Munde | ‘मला तिघेही खूप तणावात दिसतात, कारण…’ पंकजा मुंडेंचं शिंदे-फडणवीस-पवारांबाबत मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळले. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले. नुकतेच या सरकारमध्ये अजित पवार गट (Ajit Pawar Group) सामील झाला आहे. त्यामुळे राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. मात्र या नेत्यांकडून लोकांच्या समस्या सोडवल्या जातात का? त्यांच्याकडून राज्यातील जनतेला न्याय मिळतो का? तिघांमधील आश्वासक चेहरा कोण? यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. दोन महिन्यांचा राजकीय ब्रेक घेतल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्यभर ‘शिवशक्ती परिक्रमा’ सुरू केली आहे. याच दरम्यान पंकजा मुंडे एका वृत्तवाहीनीशी बोलत होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),
उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन नेत्यांपैकी कोणता चेहरा तुम्हाला आश्वासक वाटतो? असा सवाल पंकजा मुंडे
(Pankaja Munde) यांना विचारण्यात आला. यावर बोलताना मुंडे म्हणाल्या, त्यांच्याकडे पाहून मला सध्या फार काही वाटत नाही. मला सगळेजण खूप तणावात दिसतात. कारण सत्तेत आल्यापासून त्यांच्यामागे कोणते ना कोणते प्रश्न सुरु आहेत. महाराष्ट्रात मध्यंतरी पूर आला होता, आता पाणी नाही. अशा समस्या सकारात्मक पद्धतीने सोडवताना मी पाहिलं नाही. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही.

पंकजा मुंढे पुढे म्हणाल्या, मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केले आहे.
त्यामुळे त्यांच्या कामाचा झपाटा मी त्यावेळी पाहिला आहे. अजित पवार यांच्यासोबत काम करण्याचा योग आला नाही.
परंतु त्यांचा नोकरशाहीवर बराच प्रभाव आहे, हे मी माध्यमांमधून पाहिलं आहे. ते स्पष्ट बोलतात.
एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. ते एकदम शांत स्वभावाचे आहेत.
त्यांनी कार्यकर्त्यांना लळा लावला आहे, हे मला ऐकून माहिती आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खून; प्रचंड खळबळ