Parag Desai Passed Away | ‘वाघ बकरी चहा’चे पराग देसाई यांचे निधन, भटक्या कुत्र्यांचा हल्ला अखेर जीवावर बेतला

अहमदाबाद : प्रसिद्ध ‘वाघ बकरी चहा’ (Wagh Bakri Tea) कंपनीचे कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai Passed Away ) यांचे काल संध्याकाळी अहमदाबाद येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. पराग देसाई यांच्या निधनाने (Parag Desai Passed Away) कुटुंबासह उद्योग विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी विदिशा देसाई आणि कन्या परिषा असा परिवार आहे.

मागील आठवड्यात मॉर्निंग वॉक (Morning Walk) करताना घरासमोरच भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला (Escaping Street Dogs Attack) केला होता. यावेळी स्वत:चा बचाव करताना अचानक ते घसरून पडले आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यांना ब्रेन हॅमरेज (Brain Haemorrhage) झाल्याचे डॉक्टरांनी नंतर सांगितले.

कुत्र्याच्या हल्ल्यात पडल्यानंतर कुटुंबियांनी तातडीने शेल्बी रुग्णालयात नेले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना झायडस रुग्णालयात नेण्यात आले. सात दिवस ते व्हेंटिलेटरवर होते.
काल रविवार २२ ऑक्टोबर रोजी सकाळी अहमदाबादमधील खासगी रुग्णालयातच त्यांचे निधन झाले.
सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पराग देसाई हे वाघ बकरी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रस देसाई यांचे सुपुत्र होते. कंपनीच्या विक्री,
विपणन आणि निर्यात विभागाची जबाबदारी ते सांभाळात होते. कंपनीची दीड हजार कोटींची उलाढाल आहे.
१९९५ मध्ये त्यांनी कारकीर्द सुरु केली होती. ऐन उमेदीत त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | पुणे: लाच घेताना पोलीस अधिकाऱ्यासह वकील पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Pune Crime News | इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट मॅचवर सट्टा घेणारा मोठा बुकी गजाआड; 40 लाखांची रोकड जप्त; पिंपरी चिंचवड गुंडा विरोधी पथकाची कारवाई (Video)