Pune ACB Trap News | पुणे: लाच घेताना पोलीस अधिकाऱ्यासह वकील पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap News | गुन्ह्यातील कागदपत्रे देण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन 20 हजार रुपये लाच स्वीकारताना (Pune Bribe Case) पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील भिगवन पोलीस ठाण्यातील (Bhigwan Police Station) पोलीस उपनिरीक्षक आणि वकील यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) सापळा रचून रंगेहाथ पकडले. पुणे एसीबीच्या (Pune ACB Trap) पथकाने ही कारवाई भिगवन पोलीस ठाण्याच्या समोर रविवारी (दि.22) केली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Pune ACB Trap News)

भिगवन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुग्रीव लोकरे PSI Pravin Sugriv Lokre (वय 53) आणि अॅड. मधुकर विठ्ठल कोरडे Adv. Madhukar Vitthal Korde (वय – 35 रा. मु.पो. मिरजगाव, डाक बंगल्याजवळ, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 41 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली आहे. (Pune Crime News)

तक्रारदार यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांना धडक देणाऱ्या वाहनाची इन्शुरन्सची कागदपत्रे व दाखल गुन्ह्यातील इतर कागदपत्रे देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे व अॅड. मधुकर कोरडे यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली. (Pune ACB Trap News)

प्राप्त तक्रारीची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 15 व 16 ऑक्टोबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी तक्रारदार यांना कागदपत्रे देण्यासाठी भिगवन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे व अॅड. कोरडे यांनी 30 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 20 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने रविवारी भिगवन पोलीस स्टेशन समोर सापळा रचला. अॅड. कोरडे यांना पीएसआय लोकरे यांच्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
तर पीएसआय लोकरे यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. दोघांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
त्यांच्यावर भिगवन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक डॉ .शीतल जानवे (Addl SP Dr. Sheetal Janve-Kharade)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नितिन जाधव (DySP Nitin Jadhav),
पोलीस निरीक्षक वीरनाथ माने (PI Virnath Mane), पोलीस अंमलदार नवनाथ वाळके, माने, कांबळे,
चालक जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | परवानगी न घेता कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन,
शिवसेना उठाबा पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसलेंवर FIR