Parbhani Crime News | 26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Parbhani Crime News | परभणी जिल्ह्यतून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका 26 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केली आहे. हा तरुण सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडला आणि रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला असता औद्योगिक वसाहत परिसरामध्ये या तरुणाने साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे आढळले. आपल्या एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने आई-वडिलांनी मोठा आक्रोश केला. विशाल विठ्ठल इंगोले असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. (Parbhani Crime News)

काय घडले नेमके?
परभणी शहरातील प्रियदर्शनी नगरमध्ये राहणारा विशाल विठ्ठल इंगोले हा घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडला. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. यानंतर नातेवाईकांनी खूप शोधाशोध केल्यावर विशालने परभणी शहरातील औद्योगिक वसाहत परिसरामध्ये एका झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. (Parbhani Crime News)

यानंतर या घटनेची माहिती नवामोंढा पोलिसांना देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार,
सहाय्यक पो. नि. पी. एस. कवाळे, सपोउपनि आय. ए. इनामदार, पोलीस शिपाई संतोष शेटे यांनी घटनास्थळी
धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
यानंतर पोलिसांनी विशाल याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.
विशालने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
आपला एकुलता एक मुलगा गमावल्याने इंगोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विशालच्या माघारी आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

Web Title :- Parbhani Crime News | the 26 year old youth left the house and the next day the family received the sad news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shahnawaz Pradhan Passes Away | अभिनेते शाहनवाज प्रधान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Crime News | मालक – चालक यांच्या वादात हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना ठेवले कोंडून; लोणी स्टेशन येथील घटना

Akshay Kumar | अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याने केला हल्ला; व्हिडिओ व्हायरल