Parbhani MNS | धक्कादायक ! परभणीत मनसे शहराध्यक्षाचा सपासप वार करुन खून, शहरात खळबळ

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Parbhani MNS | परभणीमध्ये मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील (MNS City President Sachin Patil) यांचा मध्यरात्री चाकून सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ (Parbhani MNS) उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Parbhani Police) घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरु केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.6) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन पाटील (रा. शिवराम नगर, परभणी) हे सोमवारी मध्यरात्री शिवराम नगर भागातील मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांचा विजय जाधव (Vijay Jadhav) याच्यासोबत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. विजय याने त्याच्याकडे असलेल्या चाकूने सचिन पाटील यांच्या गळ्यावर, मानेवर वार केले. यात गंभीर जखमी (Seriously Injured) झालेल्या सचिन यांना त्यांच्या भावाने आणि मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सचिन पाटील यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जयंत मीना (SP Jayant Meena), पोलीस उपअधीक्षक
अविनाश कुमार (Deputy Superintendent of Police Avinash Kumar) यांच्यासह पोलीस निरीक्षक
संदिपान शेळके (Police Inspector Sandipan Shelke)यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी
दाखल झाला. परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आरेपी विजय जाधव याचा शोध घेत आहेत.

सचिन पाटील हे परभणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष (Parbhani MNS) म्हणून कार्यरत होते.
मागील अनेक वर्षापासून ते मनसे विद्यार्थी सेवा व विविध संघटनेच्या माध्यमातून शहरात काम करत होते.

Web Title :- Investment Tips | invest 2 to 5 lakh rupees in reit sgb index funds to get better returns than fd

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने-चांदीत तेजी, सोने 113 रुपयांनी महागले, चांदीच्या किमतीत 428 रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचे नवीन दर

Health Problems Symptoms | सकाळी उठण्याची इच्छा होत नाही, खुप आळस येतो का? मग तुमच्या आरोग्यासाठी व्हा अलर्ट

Pune Crime | डंपरच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यु; लोहगावातील पठारेवस्तीतील घटना