Parbhani Police News | धक्कादायक! कर्तव्य बजावून घरी आलेल्या पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल, पोलीस दलात खळबळ

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Parbhani Police News | परभणीच्या गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्य़ालयामध्ये कर्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास (Hanging ) घऊन आत्महत्या (Committed Suicide) केली. या घटनेमुळे पोलीस दलात (Parbhani Police News) खळबळ उडाली आहे. प्रशांत दीपक (Prashant Deepak) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दीपक यांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकले नाही.

 

परभणीच्या पूर्णा शहरातील सिद्धार्थ नगर येथे राहणाऱ्या प्रशांत दीपक हे गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्य़ालयात (Sub Divisional Officer’s Office) पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) म्हणून कार्यरत होते. बारा वर्षापूर्वी ते पोलीस दलात दाखल झाले. सोमवारी नियमितपणे त्यांनी गंगाखेड येथील उपविभागीय कार्यालयात आपले कर्तव्य बजावले आणि सायंकाळी घरी आले. मात्र, मंगळवारी (दि.20) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची खोली उघडली. त्यावेळी त्यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. (Parbhani Police News)

 

भाऊ आणि काका पोलीस दलात

प्रशांत दीपक यांच्या पर्श्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दीक हे परभणी शहर वाहतूक शाखेचे (Parbhani City Traffic Branch) पोलीस उपनिरीक्षक रवींद्र दीपक (PSI Ravindra Deepak) यांचे पुतणे तर चारठाणा पोलीस ठाण्याचे (Charthana Police Station) कर्मचारी प्रवीण दीपक (Praveen Deepak) यांचे बंधू होते.

 

अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव गावडे (Brahmadev Gawde), पोलीस निरीक्षक सुभाष मारकड (PI Subhash Markad), जमादार मुजमुले, नागनाथ पोते, विष्णू भिसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामाण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

 

 

Web Title :  Parbhani Police News | a policeman committed suicide by hanging himself at his residence

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme

 

Pune Police Inspector Transfers | 14 Police Inspectors transferred in Pune; They include senior PIs of Swargate,
Mundhwa, Khadki, Alankar, Warje Malwadi, Uttam Nagar, Khadak and Koregaon Park police stations