स्कूल क्लासच्या WhatsApp ग्रुपवर पॅरेंट्सने पाठवले पॉर्न, होऊ शकते कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  दिल्लीमध्ये एका मुलाच्या ऑनलाइन क्लास (शाळेच्या) WhatsApp group मध्ये अश्लील व्हिडिओ (पॉर्न) पाठवण्यात आले, ज्यानंतर एकच गोंधळ उडाला. हा व्हिडिओ मुलाच्या पालकांकडून चुकीने पाठवला गेल्याचे सांगितले जात आहे. तर, अनेक शाळांकडून अशाप्रकारच्या तक्रारी मिळाल्यानंतर उत्तर दिल्ली महापालिकेने अशा पालकांना सावध केले आहे आणि पुन्हा अशी चूक केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

हिन्दुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जहांगीरपुरीमध्ये एका शाळेच्या प्रिन्सीपलने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्हाला मागील महिन्यात 5 वीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक अश्लील व्हिडिओ क्लिप मिळाली होती. क्लिप विद्यार्थ्याच्या रजिस्टर्ड नंबरवरून पाठवली गेली होती. आम्ही विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना बोलावले, त्यांना असा व्हिडिओ पाठवल्याची गोष्ट नाकारली.

प्रिन्सीपल म्हणाले, आमचे शिक्षक नियमित त्या ग्रुपमध्ये मॅसेज पाठवतात आई-वडिलांना विनंती करतात की, त्यांनी ऑनलाइन वर्गांशी संबंधित कोणत्याही प्रश्नांशिवाय ग्रुपवर काहीही शेयर करू नये. आता, आम्ही शिक्षण विभागाद्वारे जारी केलेला आदेश शेयर केला आहे.

अश्लील मॅसेज पोस्ट केले जाणे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी बनवलेल्या ग्रुपमध्ये पॉर्न व्हिडिओ-फोटो प्रसारित होण्याच्या तक्रारी शाळांकडून आल्यानंतर, उत्तर दिल्ली महापालिकेने अशा कोणत्याही प्रकारासाठी जबाबदार आढळणार्‍यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

उत्तर दिल्ली महापलिकेच्या शिक्षण विभाला नरेला झोनच्या एका शाळेतून तक्रार मिळाल्यानंतर हा इशारा जारी करण्यात आला आहे. महापालिकेकडून सांगण्यात आले की, पुन्हा असा प्रकार घडला तर प्रकरणात कोणताही उशीर न करता आरोपी पालकांविरोधात एफआयआर नोंद केला पाहिजे.