केंद्र सरकारचं 75 कोटी जनतेला गिफ्ट ! आता शिधा पत्रिकेवरून एकदाच मिळणार 6 महिन्याचं रेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी म्हटले की, 75 करोड लाभार्थी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एकावेळी 6 महीन्यांचे रेशन घेऊ शकतात. सरकारने हा निर्णय कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा विचार करून घेतला आहे. सध्या, पीडीएसद्वारे लाभार्थ्याला कमाल 2 महिन्यांचे रेशन अ‍ॅडव्हान्स मिळण्याची सुविधा आहे. परंतु, पंजाब सरकार पहिल्यापासूनच 6 महिन्यांचे रेशन देत आहे. त्यांनी म्हटले की, आमच्या गोडाऊनमध्ये भरपूर धान्य आहे. आम्ही राज्य सरकारांना आणि केंद्र शासीत प्रदेशांना गरीबांना एकाचवेळी 6 महिन्यांचे रेशन वितरण करण्यास सांगितले आहे.

पासवान म्हणाले, कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरून संभाव्य प्रतिबंधात पुरवठा बाधित झाल्यास गरीबांना धान्याची कमतरता पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एकावेळी जास्त धान्य घेण्याची सूट दिल्याने सेंट्रल स्टोरेजवर प्रेशर कमी होईल, कारण काही प्रमाणात गहू उघड्यावर ठेवण्यात आले आहेत. सरकारकडे 435 लाख टन सरप्लस धान्य आहे. यात 272.19 लाख टन तांदूळ, 162.79 लाख टन गळू आहेत.

केंद्रीय मंत्री म्हणाले, केंद्राने राज्य सरकारला अ‍ॅडवायजरी जारी केली आहे. ज्यात म्हटले आहे की, कोविड-19 चा वाढता प्रकोप पाहता रेशन दुकानांवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलावीत.

साबण, थर्मल स्कॅनर, डेटॉलच्या किमतीवर लक्ष ठेवावे
कोरोना व्हायरसच्या संकटात सरकार आता साबण, लादी तसेच हात स्वच्छ करण्याचे क्लीनर आणि थर्मल स्कॅनरसारख्या वस्तूंच्या दरावर सुद्धा बारीक लक्ष ठेवणार आहे. पासवान म्हणाले, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे या वस्तूंची मागणी वाढली आहे. या वस्तूंच्या दरावर लक्ष ठेवले जात आहे.

सरकार आवश्यक वस्तु कायद्यांतर्गत 22 आवश्यक वस्तुंच्या दरांवर लक्ष ठेवते. सध्या यामध्ये मास्क आणि सॅनिटायजरचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.

You might also like