बिहारच्या मधुमिताला थेट ‘गुगल’ मधून नोकरी

पाटणा : वृत्तसंस्था
बिहारची तरुणी मधुमिता शर्माला ‘टेक जाएंट गुगल’ने वार्षिक एक कोटी पॅकेज असणारी नोकरी दिली आहे. मधुमिता मूळची पाटणा मधील सोनभद्र नावाच्या छोट्याशा भागात राहणारी आहे. स्वित्झर्लंड मधील कार्यालयात टेक्निकल सोल्युशन अभियंता म्हणून तिने सोमवारी काम करायला सुरुवा केली आहे. तिचे वडील सुरेंद्र शर्मा,आरपीएफ चे सहाय्यक कमांडेंटआहेत. सध्या ते सोनापूर येथे कार्यरत आहेत.

मधुमिताला एकेकाळी तिच्या वडिलांनी बजावले होते की,”अभियांत्रिकी क्षेत्र मुलींकरीता नाही. पण तिने ही गोष्ट खोटी ठरवत ती आता एका उच्चापदावर काम करीत आहे. तिच्या वडिलांचा विरोध असताना देखील मधुमिताने अभियांत्रिकीकरिता प्रवेश घेतला होता. पिता सुरेंद्र शर्मा यांच्या मते गुगल शिवाय अमेजॉन, माइक्रोसॉफ्ट और मर्सिडीज मोठ्या कंपनीची ऑफर सुद्धा मधुमिताला मिळाली आहे. मधुमिताने पाटणामध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. जयपुरच्या आर्य कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (2010-14) मधून कम्प्यूटर सायन्स मधून बीटेक केले. यावेळी तिची बंगळूरच्या एका कंपनीत नोकरीकरिता निवड करण्यात आली. मधुमिता सांगते की,” तिला तिच्या आई -वडील आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा मिळाली. गुगल सारख्या कंपनीमध्ये काम करणे तिचे स्वप्न होते जे तिने पूर्ण करून दाखवले.”