Pathaan Housefull | पठाण चित्रपटामुळे काश्मिरमधील थिएटरबाहेर तब्बल 32 वर्षांनी हाऊसफुल्लचा बोर्ड

पोलीसनामा ऑनलाइन : अनेक दिवसांपासून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांच्या ‘पठाण’ (Pathaan Housefull) चित्रपटाची खूपच चर्चा होती. तर आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी शाहरुख खानने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. तर अनेक ठिकाणी पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच ऍडव्हान्स बुकिंग देखील झाल्याचे दिसत आहे. तर आता काश्मीर खोऱ्यातील एका थेटर बाहेर तब्बल 32 वर्षांनी हाउसफुलचा (Pathaan Housefull) बोर्ड लागला आहे.
मल्टिप्लेक्स चेन INOX Leisure Ltd यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती जाहीर केली आहे.
त्यांनी शेअर केलेल्या ट्विटर मध्ये म्हटले की, ” 32 वर्षानंतर काश्मीर खोऱ्यातील थेटरमध्ये हाउसफुलचा (Pathaan Housefull) बोर्ड लागला आहे. आम्ही किंग खानचे आभारी आहोत. धन्यवाद” सध्या हे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. पठाण हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 100 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाचे चित्रीकरण भारताबरोबरच स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये देखील केले आहे.
Today, with #Pathaan frenzy gripping the nation, we are grateful to KING KHAN for bringing the treasured #HOUSEFULL sign back to the Kashmir Valley after 32 long years! Thank you #ShahRukhKhan𓀠 @iamsrk @thejohnabraham @deepikapadukone @YRF @PathaanTheFilm #YRF50 pic.twitter.com/bkOvyjMrOh
— INOX Leisure Ltd. (@INOXMovies) January 26, 2023
पठाण या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. तर चित्रपटातील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग
या गाण्यांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.
या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण सोबतच जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया
हे देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत . आता पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान लवकरच जवान आणि डंकी
या आगामी चित्रपटात देखील झळकणार आहे. तर शाहरुखने जवान चित्रपटातील त्याचा लुक देखील रिलीज केला
होता. एका कार्यक्रमादरम्यान राजकुमार हिराणी आणि शाहरुख खान यांनी डंकी या चित्रपटाची घोषणा केली होती.
Web Title :- Pathaan Housefull | inox housefull sign back because of shah rukh khan pathaan in kashmir valley 32 long years
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ