‘पाटील’ची छप्परफाड कमाई ; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ लाख

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – सर्वच चित्रपट गृहांत पाटील पाटील नावाची चर्चा चांगलीच रंगली असून तिकीट विक्री जोमात वाढली आहे. पाटील मराठी चित्रपट शुक्रवार ता.२६ ऑक्टोबर रोजी राज्यभर प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवसी ८६ लाख रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.

नांदेड येथील संतोष राममीना मिजगर यांची कथा, पटकथा, आणि दिग्दर्शन असलेल्या पाटील या मराठी चित्रपटात नांदेडचे नरेंद्र देशमुख व कपिल गुडसूरकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. भाग्यश्री मोटे व प्रतिमा देशपांडे या दोन अभिनेत्री या चित्रपट आहेत. नांदेड येथील सतीश गोविंदवार, मधूकर लोलगे, रुपेश टाक हे निर्माते आसून नांदेड मधील गणेश जैसवाल, राम चव्हाण यांच्यासह इतर कलावंतांच्या यात भुमिका आहेत. नांदेड शहरातील दाट वस्तीच्या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

चित्रपटात झी. नेटवर्कचे डॉ. सुभाष चंद्रा, कोकण विभागाचे आयूक्त डॉ. जगदीश पाटील, नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, यांच्या देखील या चित्रपटात भुमिका आहेत. अधिक प्राध्यान्य कोणाला द्यायचे, आई वडीलांच्या मुलांकडून अपेक्षित स्वप्नपुर्तीला की तरुणवयात होणाऱ्या प्रेमप्रकरणाला ? या मुळ कथानकासोबत फिरणारा चित्रपट असल्याची माहिती, दिग्दर्शक संतोष मिजगर यांनी दिली आहे. तरी नांदेडकरांनी हा चित्रपट आवर्जून पहावा असे आव्हान टिम पाटीलच्या वतीने करण्यात आले आहे.