SSR Case : रियानं सुशांत मानसिकरित्या आजारी असल्याचं खोट चित्र उभा केलं, सुप्रीम कोर्टात बिहार पोलिसांचं प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असताना आता बिहार पोलिसांनी सुप्रीम कोर्टात केस सीबीआयला ट्रान्सफर करण्याच्या कारणांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये अनेक महत्वाच्या बाजू मांडण्यात आल्या आहेत. प्रतिज्ञापत्रात बिहार पोलिसांनी म्हटले आहे की, सुशांतचे पैसे हडपणे या एकमेव उद्देशाने रिया आणि तिचे कुटुंबिय सुशांतच्या संपर्कात आले होते. त्यांनी सुशांतच्या मानसिक आजाराचे खोटे चित्र निर्माण केले होते. वरिष्ठ पोलीस अधीक्षक उपेंद्र शर्मा यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, रिया चक्रवर्ती सुशांत राजपूतला आपल्या घरी घेऊन गेली आणि तिने औषधाचा ओव्हरडोस देण्यास सुरूवात केली.

प्रतिज्ञापत्रात बिहार पोलिसांनी म्हटले आहे की, मुंबई पोलिसांनी सहकार्य करण्याचे टाळले असतानाही येथील तपासात अनेक महत्वाचे पुरावे सापडले आहेत. सुप्रीम कोर्टात दिलेल्या आपल्या जबाबात पोलिसांनी सांगितले की, देशात अनेक ठिकाणी तपास करण्याची गरज आहे. जर अनेक मुद्द्यावर सुशांतच्या आत्महत्येचा तपास केला तर महत्वाच्या गोष्टींचा खुलासा होऊ शकतो.

प्रतिज्ञापत्रात हे देखील म्हटले आहे की, बिहार पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्याचा अधिकार होता, परंतु त्यांना करू दिले नाही. यासोबतच मुंबई पोलिसांनी कोणताही गंभीर गुन्हा दाखल केला नाही. प्रकरणाची संवेदनशीलता पाहता सीबीआय तपासाची शिफारस केली गेली.

दरम्यान, रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी सांगितले की, रिया शुक्रवारी ईडीच्या चौकशी प्रक्रियेत सहभागी होणार नाही. मुंबई येथील ईडीच्या ब्रँच ऑफिसमध्ये रियाला बोलावण्यात आले होते. तर ईडीने रिया चक्रवर्तीचे अपील फेटाळले. रियाने ईडीकडे हजर होण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. ईडीने रिया चक्रवर्तीला हजर होण्यास सांगितले आहे.