शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल सुरू, उमेदवारांसाठी आज प्रशिक्षण शिबीर

सांगली  पोलीसनामा ऑनलाईन:

राज्यात आता शासकीय शाळांसह आता खासगी शाळांमध्ये देखील भरती प्रक्रिया राज्य शासनाकडूनच होणार आहे. ही प्रक्रिया एका पोर्टल द्वारे होणार आहे .  ‘पवित्र ‘असे या पोर्टलचे नाव आहे. हे पोर्टल शुक्रवारी सुरु झाले. यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेत शिक्षक पदासाठी भरती केली जाणार आहे. अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरु झाली आहे. शिक्षण सेवक भरतीची कार्यवाही ई-गव्हर्नन्स सेलद्वारे राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे. ‘पवित्र’चे कामकाज सुरू झाले आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेसाठी वेळापत्रक देखील निश्चित केले आहे. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे आसन क्रमांक आणि त्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याचा दिनांक निश्‍चित केलेला आहे. दि 6 जुलै ते 23 ऑगस्ट 2018 या कालावधीत ही नोंदणी होणार आहे.

[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d68548c2-81b6-11e8-bcb8-179dc3950b56′]

पवित्र पोर्टलवर प्रत्येक पातळी/स्तरावर माहिती भरण्यासाठीचे मार्गदर्शन शिबीर शनिवारी सकाळी 11 वाजता विलिंग्डन महाविद्यालयात वेलणकर सभागृहात होणार आहे. मुख्याध्यापकांनी या शिबीराला येताना संस्थेने मागासवर्गीय कक्षकडून तपासलेला रोष्टर उतारा (तीन वर्षांच्या आतील) झेरॉक्स प्रत आणावी. ज्या संस्थांनी रोष्टर अद्यावत केले नसेल त्यांनी तात्काळ तशा प्रकारची कार्यवाही करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे यांनी केले आहे.

उमेदवारांसाठी आज प्रशिक्षण शिबीर

पवित्र पोर्टलद्वारे उमेदवार, संस्था व शासन स्तरावरून माहिती भरून घेऊन कार्यवाही करायची आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलमध्ये माहिती अचूक भरण्यासाठी शनिवारी दुपारी 2 वाजता विलिंग्डन महाविद्यालयात वेलणकर सभागृहात प्रशिक्षण शिबीर होणार आहे. जिल्ह्यातील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा.