ग्राहकांसाठी खुशखबर ! 809 रुपयांचा गॅस सिलिंडर केवळ 9 रुपयांत मिळणार, जाणून घ्या ‘ऑफर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियल ऑईल कॉर्पोरेशनने एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. हि माहिती ग्राहकांसाठी गुड न्युज आहे. पेटीएमकडून (Paytm) स्वस्त घरगुती गॅस (Gas Cylinder) खरेदी करण्यासाठी एक बंपर ऑफर दिली आहे. तर या ऑफरद्वारे ग्राहकाला ८०९ रुपयांचा गॅस सिलेंडर आता केवळ ९ रुपयांमध्ये मिळणार आहे.  Paytm कडून गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी हा कॅशबॅक उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकाला सिलिंडर बुक केल्यावर ८०० रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळणार आहे. Paytm ऑफरची हि मुदत ३० एप्रिल २०२१ पर्यंत असणार आहे.

तर आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १० रुपयांनी कपात झाली आहे. या कपातीनंतर राजधानी दिल्लीत अनुदानाशिवाय १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडरची (LPG gas cylinder) किंमत ८०९ रुपये आहे. मात्र पेटीएम (Paytm) ने स्वस्त घरगुती गॅस खरेदी करण्यासाठी बंपर ऑफर आणली आहे. यादरम्यान, आगामी २ वर्षांत सरकार देशातील नागरिकांना १ कोटी मोफत LPG कनेक्शन देणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारीही केली जात आहे. भारतातील प्रत्येक घरात LPG कनेक्शन मिळावे यासाठी सरकार उज्ज्वलासारखी योजना चालवित आहे. सरकार किमान कागदपत्रांत LPG कनेक्शन देण्याची तयारी करत आहे. बदललेल्या नियमांमध्ये रहिवासी दाखला नसतानाही LPG कनेक्शन देण्याची योजना आहे. असे तरुण कपूरने म्हटले आहे.

 कसा घ्याल ऑफरचा लाभ?
> ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला मोबाईलमध्ये पेटीएम (Paytm App) डाऊनलोड करावा लागेल. .
> App डाऊनलोड केल्यानंतर गॅस एजन्सीद्वारे ग्राहकाला सिलेंडर बुकिंग करावे लागेल.
> पहिल्यांदा Paytm वर जा आणि Show more क्लिक करा यानंतर, ‘Recharge and Pay Bills’ वर क्लिक करा.
> आपल्याकडे book a cylinder करण्याचा पर्याय असेल. इथे तुम्हाला गॅस प्रोव्हायडर निवडावा लागेल.
> बुकिंग करण्यापूर्वी तुम्हाला FIRSTLPG चा प्रोमो कोड द्यावा लागेल जेणेकरून तुम्हाला कॅशबॅकची सुविधा मिळेल.
> कॅशबॅक ऑफर ३० एप्रिल २०२१ रोजी समाप्त होत आहे. बुकिंगच्या २४ तासांच्या आत ग्राहकाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड ७ दिवसांच्या आत वापरावे लागणार आहे.

दरम्यान, एलपीजीच्या किंमती १० रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. अनुदानाशिवाय १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत ८०९ रुपये, कोलकातामध्ये ८३५.५०  रुपये, मुंबईत ८०९ रुपये आणि चेन्नईमध्ये ८२५ रुपये आहे.