Paytm नं लहान शहरातून सुरू केली ‘हायरींग’ ! Work From Home अंतर्गत करू शकतील काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेटीएम (Paytm) चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी बुधवारी सांगितलं की, कोरोना महामारीच्या काळात कंपनीनं लहान शहरातून कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याच्या प्रयत्नांना गती दिली आहे. त्यांनी मोठ्या शहरातील ऑफिसात येण्याऐवजी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. क्लीयर टॅक्स ई इनव्हॉइसिंग लिडरशिप कॉनक्लेव्ह मध्ये शर्मा म्हणाले, सुरुवातील ज्या लोकांना नियुक्त केलं आहे त्यांना स्थिती सामान्य झाल्यानंतर ऑफिसला बोलवण्याची योजना आहे.

त्यांनी सांगितलं की, आम्ही लहान शहरातील लोकांची नियुक्ती वाढवत आहोत. लोकं चंदीगढ, जालंधर, ओडिशा सहित जिथं कुठेही असतील तिथून काम करू शकतात.

‘लहान शहरातील कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही’
विजय शेखर शर्मा यांनी सांगितल्यानुसार, कंपनीनं याबाबत एखादं विशेष मॉडेल तयार केलेलं नाही. परंतु 20 ते 25 टक्के कर्मचारी भविष्यात आपल्या हिशोबानं घरी बसून काम करू शकतात. लहान शहरातील लोकांना ऑफिसात जाण्याची गरज नाही.

कंपनीनं स्विकारलं हायब्रिड मॉडेल
आयटी आणि आयटी संबंधित सेवा देणाऱ्या कंपन्या आता काही कर्मचाऱ्यांना आपल्या सुविधेनुसार घरून काम करण्याची परवानगी देत आहे. याबाबत त्या हायब्रिड मॉडेल स्विकारत आहेत. म्हणजेच काहींना ऑफिसमधून तर काही लोकांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात सरकारनं देखील बीपीओ (बिजनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) आणि आयटी संबंधित कंपन्यांसाठी सोपी मार्गदर्शक तत्वे जारे केली आहेत. जेणेकरून त्यांचा अनुपालनाचा भार कमी होईल आणि त्या कर्मचाऱ्यांसाठी घरून किंवा कुठूनही काम करण्यासाठीची रुपरेषा स्विकारता येईल.