PCMC News | पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामावर बुलडोजर, सुमारे 2 लाख 32 हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – PCMC News | महापालिका कार्यक्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात येऊन पत्राशेड व बांधकामे अशी एकूण २ लाख ३२ हजार चौरस फुट क्षेत्र निष्कासणाची कारवाई करण्यात आली असून ही कारवाई यापुढेही चालू राहणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली. Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)

पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर अभियंता मकरंद निकम यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.(PCMC News)

ड क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक फाटा उड्डाणपूल ते साई चौक जगताप डेअरी या मर्गलागतच्या अनधिकृत पत्राशेड व बांधकामावर कारवाई करण्यात आली सुमारे १ लाख २ हजार चौरस फुट क्षेत्राचे पत्राशेड पाडण्यात आले. तर क कार्यक्षेत्रालगतच्या १ लाख ३० हजार चौरस फुट अतिक्रमण कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या आठही क्षेत्रीय कार्यालयांकडील टीम मार्फत कारवाई करण्यात आली.

या कारवाईत उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रिय अधिकारी अंकुश जाधव, अमित पंडित, अजिंक्य येळे, सुचिता पानसरे, ५ उपअभियंता ५ कनिष्ठ अभियंता, २४ बीट निरीक्षक, अतिक्रमण विभागाकडील एक पोलिस अधिकारी, ५ पोलिस, ३ महिला पोलिस, ८० एम एस एफ जवान, सांगवी पोलीस स्टेशन कडील ५ पोलीस, ३ महिला पोलीस, ५ जे सी बी,२ कटर तसेच ३० मजूर सहभागी झाले होते.

तर प्रभाग क्र.०२ मधील कुदळवाडी, चिखली ३० मीटर डी.पी.रस्त्यामधील सुमारे ३२ हजार २८० चौरस फुट क्षेत्रातील ०३ आर.सी.सी. बांधकामे तसेच सुमारे ९७ हजार ८४० चौरस फुट क्षेत्रामधील ०७ वीट बांधकामांसह १५ पत्राशेड अशी एकूण १ लाख ३० हजार चौरस फुट क्षेत्रावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली आणि रस्ता रुंदीकरण करण्यात आले.

क, ई, फ आणि ह क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, राजेश आगळे, सिताराम बहुरे आणि उमेश ढाकणे
तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता सुर्यकांत मोहिते, मनोज बोरसे, नरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली
कनिष्ठ अभियंता संदिप वैद्य, किरण सगर, इम्रान कलाल, क्षितीजा देशमुख, चंद्रकांत पाटील, प्रियंका म्हस्के, रचना दळवी
व संदिप वाडीले तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ऎश्वर्या मासाळ, केशव खांडेकर, निकिता फ़डतरे, श्रीकांत फ़ाळके,
स्मिता गव्हाणे व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस, यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई
करण्यात आली.

दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर बेवारस वाहने उभी करु नये.
तसेच अनाधिकृत टपऱ्या, पत्राशेड, बॅनर्स उभारु नये. तसेच फुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे.
महापालिका क्षेत्रात प्रशासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही बांधकाम करु नये, असे आवाहन क्षेत्रीय
अधिकाऱ्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना केले आहे. तसेच महापालिकेमार्फत अतिक्रमण कारवाई
सर्वच प्रभागात यापुढेही चालू राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | खडकी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेरांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत