थर्टी फर्स्टला मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या चालकांना दंड आणि सक्तमजुरीची शिक्षा

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा थर्टी फर्स्ट साध्या पणाने करण्याचे आवाहन प्रशासनकाकडून करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून ड्रंक अँड ड्रईव्हची कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक शाखेने 25 वाहनचालकांवर कारवाई करुन त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यापैकी तिघांना न्यायालयाने दंड व सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

शहर वाहतूक शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यापैकी तिघांना दोषी धरून तीन हजार रुपयापासून दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड व दंड न भरल्यास चार दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. हा निकाल इचलकरंजी येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी (दि.6) दिला आहे. गौतम अशोक बनसोडे (रा. कोरोची), पोपट दशरथ मद्दीहळी (रा. जुना चांदूर रोड) आणि विनायक हणमंत जावळे (रा. लालनगर) अशी शिक्षा झालेल्या मद्यपी चालकांची नावे आहेत.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली होती. या कारवाईत 25 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर या वाहनचालकांवर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. यातील तिघांचा निकाल न्यायालनया दिला. गौतम बनसोडे याला न्यायालयाने तीन हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक दिवसाची सक्तमजुरी, तर पोपट मद्दीहळी व विनायक जावळे यांना न्यायालयाने प्रत्येकी दहा हजार रुपये व दंड न भरल्यास चार दिवसांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.