परभणीकरांचा रविवारी पुण्यात स्नेह मेळावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

परभणी जिल्ह्यातील नागरिक पुण्यामध्ये स्थायीक झाले आहेत. पुण्यात स्थायीक झालेल्या नागरिकांची ओळख व्हावी, त्यांच्यात संवाद वाढावा या हेतून परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पुण्यामध्ये रविवारी (दि.७) स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’408d6d84-c97f-11e8-ad26-4f445e10b062′]

कोथरुड येथील रामबाग कॉलनी, तुळजा भवानी मंदिराजवळील शराव लॉन्स या ठिकाणी या स्नेह मेळाव्याचे सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्नेह मेळाव्याला परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाजप नेत्यांना ‘या’ गावात येण्यास सक्त बंदी

कामानिमीत्त, नोकरीनिमीत्त नागरिक परभणी जिल्ह्यातून पुण्यात आले आहे. काही नागरिक पुण्यात स्थायीक झाले आहेत. त्यांचे जिल्ह्याशी आसलेली आपुलकी वाढावी, या नागरिकांमध्ये ओळख वाढावी, स्नेह वाढावा, विचारांची देवाण- घेवाण व्हावी या उद्देशाने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेह मेळाव्याला पुण्यात स्थायीक झालेल्या परभणीकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.

[amazon_link asins=’B014103BHI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a21a92f6-c97f-11e8-9f26-7b398fad889a’]