राज्यातून अवैध धंद्यांना हद्दपार करण्यासाठी जनतेचा पाठिंबा आवश्यक : विश्वास नांगरे पाटील

तासगाव : पोलीसनामा आॅनलाइन – राज्यात अवैध धंद्यांना हद्दपार करण्यासाठी सामान्य जनतेचा पोलिसांना पाठिंबा आवश्यक आहे. राज्यातील अवैध धंदे हद्दपार करण्याची सुरुवात तासगाव तालुक्यातून करत आहोत. तासगाव तालुका अवैध धंदेमुक्त करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांचेकड़े मी देत आहे, अशी मोठी घोषणा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे – पाटील यांनी केली. ते लोकप्रतिनिधींच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पोलीस अधीक्षक शर्मा, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर उपस्थित होते. पुढे

नांगरे – पाटील म्हणाले, कोणत्याही गावात मटका बंदी, दारु बंदी अथवा सर्व अवैध धंदे बंद करायचे असतील तर त्यासाठी स्थानिक पंचांची गरज असते. बर्‍याच वेळेस पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे न्यायालयात सिद्ध होत नाहीत. जर स्थानिक पंच असतील तर काळे धंदे बंद होण्याच फायदाच होईल. पोलिसांना मदत करा. चांगले पोलिसिंग होईल.

याबाबत काही लोकप्रतिनिधींनी बिट हवालदार गावात नसतात, अशी तक्रार केली. नांगरे – पाटील यांनी यावेळी तासगाव उपविभागांतर्गत येणार्‍या सर्व पोलीस ठाणे व त्याअंतर्गत येणार्‍या सर्व बिट हवालदारांना बिटवर थांबून काम करायच्या सूचना केल्या. ते म्हणाले, पोलीस आणि जनता यांच्यामध्ये सलोखा राहिल, असे काम पोलिसांनी करणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर जातीवाचक, भावना भडकतील अशा आक्षेपार्ह पोस्ट केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. असे काही व्हाट्सअॅप आपणास आढळून आल्यास पोलिसांना माहिती द्या. तरुणपिढी सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकत आहे. त्यांना वेळीच सावरले पाहिजे.

यावेळी सावर्डेचे सरपंच प्रदीप माने अवैध धंदेसाठी मोर्चा काढला होता. त्यांच्या मोर्चाची दखल घेउन मी घोषणा करत आहे. तालुक्यातील अवैध धंदे रोखण्यासाठी सुहेल शर्मा यांचेकड़े जबाबदारी देत आहे, यावेळी पोलिस उपाधीक्षक अशोक बनकर,नगराध्यक्ष विजय सावंत,खुजट वकील,प्रदीप माने,अमोल शिंदे तालुक्यातील महिला वर्ग जास्त उपस्थित होता.

पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी तासगाव तालुक्याच्या अड़ीअड़चणी जाणून घेण्यासाठी तासगावात प्रतेक महिन्यात मीटिंग आयोजित करावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.