कार्ति चिदंबरम यांना विदेशात जाण्यास परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आजयएनएक्स  मीडिया घोटाळा प्रकरणातील आरोपी  माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम याला सर्वोच्च न्यायालयाने परदेशात जाण्याकरिता परवानगी दिली आहे. सोमवारी याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने २३ ते ३१ जुलै दरम्यान विदेशात जाण्याकरिता परवानगी दिली आहे. कार्ति चिदंबरम यांना फक्त ७ दिवसांसाठीच देशाबाहेर  जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर भारताबाहेर जाण्यास परवानगी मिळणार नसल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हंटले आहे

[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88b156b2-8e63-11e8-aac7-6d17b5ec6734′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कार्ति यांनी  व्यवसाय आणि टेबल टेनिस असोसिएशनच्या बैठकीकरिता तीन देशांच्या दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळावी याकरिता याचिका दाखल केली होती .अमेरिका ,ब्रिटन आणि फ्रान्स या देशात  जाण्याची परवानगी कार्ति यांनी मागितली होती. व्यवसायाकरिता  हा दौरा आवश्यक असल्याचे त्यांनी अर्जात म्हंटले होते. कार्ति यांच्या या अर्जाचा विचार करीत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विदेशात जाण्यास परवानगी दिली आहे.

 कार्ति चिदंबरम यांच्यावरील  आरोप
कार्ति चिदंबरम यांच्यावर ४५ कोटी रूपयांच्या फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्टचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपी केले आहे. वासन हेल्थकेअर प्रा. लि. कंपनीशी कथितरित्या संबंधित असल्याचा कार्ति यांच्यावर आरोप आहे. या कंपनीशी निगडीत विदेशी गुंतवणुकदारांकडून विविध नावांनी सुमारे २१०० कोटी रूपये घेतले आहेत. तर १६२ कोटी रूपये वेगळे घेण्यात आले आहेत. या देवाणघेवाणीत कार्ति यांची कंपनी मे. अडव्हांटेज स्ट्रॅटजिक कन्सल्टिंग प्रा. लि.चाही समावेश होता. या कंपनीला यासाठी ४५ कोटी रूपये मिळाले होते.
जाहिरात