पेट्रोल डिझेलच्या किंमतीत भाववाढ सातत्याने सुरुच; जाणून घ्या आजचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रचंड नफा कमविणार्‍या आणि केंद्र सरकारला लाभांशच्या रुपाने व कराच्या रुपाने मोठ्या प्रमाणावर महसुल मिळून देत असतानाच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करणे कायम ठेवले आहे. पेट्रोलच्या किंमतीत आज लिटरमागे २५ पैशांनी वाढ झाली आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर ९८.८२ रुपये इतका झाला आहे.

डिझेल आज लिटरमागे ३० पैशांनी महागले आहे. आता डिझेलचा दर प्रति लिटर ८९.०१ रुपये इतका झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात २६ पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. पॉवर पॅट्रोलचा दर आज पुण्यात १०२.५१ रुपये लिटर झाले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्याचा परिणाम उद्योगावर झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला मिळणार्‍या उत्पन्नात घट झाली आहे. पेट्रोल, डिझेलवरील करातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असतो. या महसूलासाठीच केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीकडे दुर्लक्ष केले जात आहे.