Petrol Diesel Price | 28 दिवसात पेट्रोल 7.1 रुपये आणि डिझेल 7.50 रुपयांनी झाले महाग, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांतील दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतत घसरण झालेली आहे. दरम्यान आज तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) भाव स्थिर ठेवले आहेत. आज (बुधवार, 23 जून 2021) पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कोणताही बदल झाला नाही. मात्र, काल मंगळवारी किंमतीत वाढ झाली होती. 4 मे नंतर मागील 49 दिवसात पेट्रोल-डिझेल 28 वेळा महागले आहे. या 28 दिवसात पेट्रोलचा भाव 7.1 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा भाव 7.50 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचला आहे. Petrol Diesel Price | In 28 days, petrol became expensive by Rs 7.1 and diesel by Rs 7.50. Find out the rates in major cities of the state including Mumbai-Pune.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

मुळ किंमती इतकाच टॅक्स
तेल कंपन्या अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा मागील 15 दिवसाचा सरासरी भाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात तेजी किंवा घसरण या आधारवर इंधनाचा भाव ठरवतात. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारकडून भरक्कम टॅक्स वसूल केला जातो. पेट्रोल पम्पपर्यंत इंधन पोहचण्यासाठी माल वाहतुक आणि डिलर कमिशन इत्यादीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव विक्रमी स्तरावर पोहचले आहेत.

पेट्रोल-डिझेलवर किती टॅक्स वसूल करते सरकार
मोदी सरकार (Modi government) प्रति लीटर पेट्रोल पर 34.80 टक्के एक्साईज ड्यूटी वसूल करते, एक्साईज ड्यूटीतील 100 टक्के पैसे केंद्र सरकारच्याच तिजोरीत जातात. तर राज्य सरकार 23.08 टक्के टॅक्स वसूल करते.

डिझेलवर केंद्र सरकार 37.24 टक्के आणि राज्य सरकार 14.64 टक्केपर्यंत टॅक्स (Tax) वसूल करते.

मागच्या वर्षी कोरोना काळात तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी घसरण होऊनही ग्राहकांना लाभ देण्याऐवजी मोदी सरकारने एक्साईज ड्यूटीत विक्रमी वाढ केली होती.

पेट्रोल-डिझेलचे आजचे अनुक्रमे दर

मुंबई – 103.63 – 95.72
पुणे – 103.52 – 94.13
ठाणे – 103.34 – 93.93
अहमदनगर – 103.27 – 93.90
औरंगाबाद – 104.87 – 96.96
धुळे – 103.51 – 94.13
कोल्हापूर – 103.81 – 94.44
नाशिक – 103.98 – 94.57
रायगड – 103.24 – 93.83

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर
प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती
तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1. इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2. बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3. एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता

Web Title :- Petrol Diesel Price | In 28 days, petrol became expensive by Rs 7.1 and diesel by Rs 7.50. Find out the rates in major cities of the state including Mumbai-Pune.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी