बजेट नंतर आता महागाईचा झटका ! ‘LPG सिलेंडर’ आणि ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात वाढ, जाणून घ्या किंमती

नवी दिल्ली : आज गुरुवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दरात 35-35 पैसे प्रति लीटरची वाढ केली आहे. दिल्लीत पेट्रोल 86.65 रुपये लीटर झाले आहे. अशाच प्रकारे एलपीजी सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. या इंधन दरवाढीमुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे.

बजेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर कृषी इन्फ्रा सेस लावण्यात आला आहे. परंतु, सरकारचा दावा आहे की, याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होणार नाही.

किती झाला सिलेंडर दर
इंडियन ऑईलनुसार ग्राहकांना 14 किलोग्रॅमच्या नॉन सबसिडी घरगुती सिलेंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. एलपीजी सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. यासाठी दिल्लीत 719 रुपये प्रति सिलेंडर, कोलकातामध्ये 745.50 रुपये प्रति सिलेंडर, मुंबईत 710 आणि चेन्नईत 735 रुपये प्रति सिलेंडर द्यावे लागतील.

अंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल लागोपाठ मजबूत होत आहे. मात्र, भारतीय बॉस्केटसाठी जे कच्चे तेल येते त्यावर अंतरराष्ट्रीय रेटचा परिणाम 20-25 दिवसानंतर दिसून येतो.

हे आहेत प्रमुख शहरांचे रेट
दिल्लीत गुरुवारी पेट्रोल 86.65 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचले, तर डिझेल 76.83 रुपये प्रति लीटरवर पोहचले. अशाप्रकारे मुंबईत पेट्रोल 93.20 रुपये आणि डिझेल 83.67 रुपये लीटर, चेन्नईत पेट्रोल 89.13 रुपये आणि डिझेल 82.04 रुपये प्रति लीटर तसेच कोलकातामध्ये पेट्रोल 88.01 रुपये आणि डिझेल 80.41 रुपये लीटर झाले आहे. नोएडामध्ये पेट्रोल 85.91 रुपये आणि डिझेल 77.24 रुपये लीटर झाले आहे.

नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी नवीन ऊंची गाठली आहे. यामुळे महागाई भडकण्याची चिन्ह आहेत. विशेषकरून डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम अनेक सेक्टरवर होतो. यामुळे शेतकर्‍यांचा सिंचन खर्च वाढतो आणि वाहतूक भाडे महागते. माल वाहतूक महागाल्याने सर्वच वस्तूंचे दर वाढतात.