3 दिवसांत 40 पैशांपर्यंत महाग झाले पेट्रोल, डिझेलच्या किंमतीही 61 पैशांनी वाढल्या, जाणून घ्या नवीन दर

पोलीसनामा ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय पातळीवरील ईंधनच्या किंमतींमध्ये वाढीचा परिणाम घरगुती स्तरावरही दिसून येत आहे. देशात रविवारी पेट्रोलच्या किंमतींमध्ये आठ पैसे आणि डिजेलच्या किमतीत 19 पैशांची वाढ नोंदविली गेली आहे. तेल विपणन कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत रविवारी 81.38 रुपयांवरून 81.46 रुपये प्रति लिटर झाली. त्याचप्रमाणे डिझेलची किंमत 70.88 रुपयांवरून 71.07 रुपये प्रति लिटर झाली आहे. शुक्रवारपासून सरकारी तेल विपणन कंपन्या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ करीत आहेत. गेल्या तीन दिवसांत पेट्रोल 40 पैशांनी महागले आहे, तर डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर 61 पैशांची वाढ झाली आहे.

दरम्यान, 22 सप्टेंबरनंतर थेट 20 नोव्हेंबरला पेट्रोलच्या किंमतीत काही बदल करण्यात आले. त्याचबरोबर 2 ऑक्टोबरनंतर डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दराच्या आधारे तेलाच्या किंमतींमध्ये सुधारणा करतात. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे स्थानिक कर किंवा व्हॅट दरांमुळे वेगवेगळे असतात.

मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
रविवारी मुंबईत पेट्रोलची किंमत 88.09 रुपयांवरून 88.16 रुपये प्रति लिटर झाली. तर डिझेलची किंमत 77.34 रुपयांवरून 77.54 रुपये प्रतिलिटर झाली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे पेट्रोलचे दर प्रति लिटर 83.03 रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे, एक लिटर डिझेल खरेदी करण्यासाठी, आपल्याला 76.64 रुपये दराने पैसे द्यावे लागतील. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 84.53 रुपये झाला आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर 76.55 रुपयांवर पोहोचली आहे.

लखनऊ, पटना, नोएडा येथील किमती उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 81.86 रुपयांवर पोहोचला आहे. डिझेलची किंमत प्रतिलिटर 71.51 रुपये झाली आहे. पाटण्यात एक लीटर पेट्रोल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 84.08 रुपये द्यावे लागतील. त्याचवेळी, शहरातील एक लिटर डिझेल खरेदी करण्यासाठी, प्रतिलिटर 76.64 रुपये दराने भरावे लागेल. राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये एक लिटर पेट्रोल खरेदी करण्यासाठी तुम्हाला प्रतिलिटर 81.95 रुपये द्यावे लागतील. शहरातील एक लिटर डिझेलची किंमत 71.57 रुपयांवर पोहोचली आहे.