राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 101 रुपये प्रतिलिटर

नवी दिल्ली: परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात. रोज वाढणारे इंधन दर शुक्रवारी स्थिर राहिले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल न केल्याने दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव ८६.३० रुपये प्रति लीटर राहिले. मात्र मुंबईत पेट्रोलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. ९३ रुपये प्रति लीटरच्या आसपास पेट्रोलचे दर आहेत. देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगर याठिकाणी पेट्रोलचे दर १०१ रुपये प्रति लीटर झाले आहेत. दरम्यान, गेल्या २७ दिवसापैकी एकूण १० दिवसच इंधनाचे दर वाढले आहेत. मात्र या दिवसात पेट्रोल एकूण २.५९ रुपये प्रति लीटरने महागले आहे. तर डिझेलच्या किंमतीमध्ये ०२.३५ रुपये प्रति लीटरची वाढ झाली आहे.

दररोज सकाळी ६ वाजता बदलते किंमत
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

महानगरांमधील पेट्रोलचे दर
दिल्ली: पेट्रोल ८६.३५ रुपये आणि डिझेल ७६.४८ रुपये प्रति लीटर
मुंबई: पेट्रोल ९२.८६ रुपये आणि डिझेल ८३.३० रुपये प्रति लीटर
कोलकाता: पेट्रोल ८७.६९ रुपये आणि डिझेल ८०.०८ रुपये प्रति लीटर
चेन्नई: पेट्रोल ८८.८२ रुपये आणि डिझेल ८१.७१ रुपये प्रति लीटर
नोएडा: पेट्रोल ८५.६७ रुपये आणि डिझेल ७६.९३ रुपये प्रति लीटर
रांची: पेट्रोल ८४.८० रुपये आणि डिझेल ८०.९१ रुपये प्रति लीटर
बंगळुरू: पेट्रोल ८९.२१ रुपये आणि डिझेल ८१.१० रुपये प्रति लीटर
पाटणा: पेट्रोल ८८.७८ रुपये आणि डिझेल ८१.६५ रुपये प्रति लीटर
लखनऊ: पेट्रोल ८५.५९ रुपये आणि डिझेल ७६.८५ रुपये प्रति लीटर

SMS च्या माध्यमातून मिळवा पेट्रोल-डिझेलचे नवे दर
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. त्यामुळे आपणाला नवे दर हवे असल्यास एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. दरम्यान, देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी ६ नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.