पुणे : पेट्रोलची घोडदौड आजही पुन्हा सुरुच राहिली आहे. आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
चार दिवसात पेट्रोल ८० पैशांनी तर डिझेलमध्ये तब्बल १ रुपया ३० पैशांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ यापुढेही अशीच चालू राहणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे.
पुण्यात आज पेट्रोलचे दर ९४.२८ रुपये लिटर असा राहणार आहे तर, डिझेल प्रतिलिटर ८३.६८ रुपये इतका असणार आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर ९४.३६ रुपये लिटर आणि डिझेलचा दर ८४.९४ रुपये इतका झाला आहे. राज्यात परभणी येथे पेट्रोलचा दर हा सर्वाधिक ९६.४८ रुपये लिटर इतका झाला आहे.
पेट्रोल डिझेलचे प्रतिलिटर दर
५ फेब्रुवारी – ९३.१४ ८२.३८
९ फेब्रुवारी – ९३.४८ ८२.७४
१० फेब्रुवारी – ९३.७७ ८३.००
११ फेब्रुवारी – ९४.०० ८३.३१
१२ फेब्रुवारी – ९४.२८ ८३.६८