PF चा लाभ घ्यायचा असेल तर फॉर्म 10C बाबत जाणून घ्या, अन्यथा नंतर काढू शकणार नाही पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PF News | जेव्हा एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीतून रिटायर होतो तेव्हा त्याच्याकडे पीएफचे पैसे काढण्याचा एक पर्याय असतो, यासाठी त्यास फॉर्म 10C भरणे आवश्यक असते. यासाठी त्याच्याकडे यूएएन नंबर असायला हवा जो EPF चा 12 अंकाचा युनिक नंबर असतो. तसेच कर्मचार्‍याकडे ईपीएफ सर्टिफिकेट असते ज्यामध्ये त्याचा सर्व्हिस पिरियड आणि कुटुंबातील सदस्यांची पूर्ण डिटेल असते. कुटुंबाची डिटेल यासाठी दिली जाते जेणेकरून दुर्दैवाने या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला तर पीएफचे पैसे नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला मिळावेत. हे सर्व फायदे तेव्हाच मिळू शकतात जेव्हा कर्मचारी फॉर्म 10C भरेल. याबाबत जाणून घेवूयात…

ऑनलाइन असा भरा फॉर्म 10सी

ईपीएफच्या पोर्टलवर जा आणि Employers Portal टॅबवर क्लिक करा

पुढील पेज उघडेल जिथे UAN नंबर आणि पासवर्ड भरावा लागेल

येथे मेन्यू बारमध्ये Online Services टॅब दिसेल ज्यावर क्लिक करा

ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये जाऊन फॉर्म 10सी, 19 आणि 31 वर क्लिक करा

पुढील पेजवर आपली नोकरी, केवायसी आणि मेंबर डिटेलची तपासणी करा

व्हेरिफिकेशनसाठी रजिस्टर्ड बँक अकाऊंटचे शेवटचे 4 अंक नोंदवा

Certificate of Undertaking च्या टर्म आणि कंडीशन अ‍ॅग्री करा

पुढील पेजच्या बॉटमवर जा आणि I want to apply for वर क्लिक करा आणि Only Pension Withdrawal Form 10C सिलेक्ट करा

आता Get Aadhaar OTP सिलेक्ट करा. तत्पूर्वी अ‍ॅड्रेस नोंदवा

रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी मिळेल. तो Validate OTP and Submit Claim Form मध्ये नोंदवा.

 

यावेळी मिळेल लाभ

ईपीएफ विड्रॉल फॉर्म 10C भरल्यावर तुमच्या मोबाइल नंबरवर एक एसएमएस येईल. काही दिवसानंतर बँक अकाऊंटमध्ये PF चे पैसे ट्रान्सफर होतील. मात्र, या फॉर्मचा लाभ सर्वांना मिळत नाही आणि काही अटी असतात. जर एखाद्या मेंबरने 10 वर्षाच्या नोकरीच्या अगोदर राजीनामा दिला असेल, जर कुणी मेंबर एखाद्या कंपनीत 10 वर्ष नोकरी न करता 58 वर्षाचा झाला तर त्यास फॉर्म 10Cचा फायदा मिळेल. परमनंट रिटायरमेंटच्या अगोदरच या फॉर्मचा लाभ घेतला जाऊ शकतो.

फॉर्ममध्ये काय भरावे लागते
फॉर्ममध्ये पीएफच्या पैशांचा क्लेम करणार्‍याचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, पतीचे नाव (जर अ‍ॅप्लिकेबल असेल), रिटायर्मेंटच्या अगोदर कर्मचार्‍याने ज्या कंपनीत काम केले तिचे नाव आणि पत्ता, ज्या मागील कंपनीत केले असेल तिचा रिजन कोड आणि त्या व्यक्तीचा पीएफ अकाऊंट नंबर, मागील कंपनीची जॉयनिंग डेट, जॉब सोडण्याचे कारण आणि तारीख, घराचा पूर्ण पत्ता, कुटुंबाची पूर्ण माहिती आणि पैसे पोस्टल मनी ऑर्डरने, चेकने किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंटने हवेत, याची माहिती द्यावी लागते.

Web Title :- PF | epf withdrawal needs to file epf form 10c how to fill 10c form and benefits of epf 10c form

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल